ZP Pune Bharti 2023 | Zilla Parishad Pune Recruitment 2023 ।जिल्हा परिषद भरतीला सुरुवात ; एक हजार जागांसाठी भरती
ZP Pune Bharti 2023 | Zilla Parishad Pune Recruitment 2023 । पुणे : जिल्हा परिषद भरतीप्रक्रियेला अखेर सुरुवात झाली असून, गट क’ सवंर्गातील 21 विविध विभागांतील एक हजार पदे भरली जाणार आहेत. त्यासाठी आजपासून रात्री बारा वाजल्यापासून ऑनलाइन अर्ज करण्यासाठी लिंक ओपन खुली केली जाणार आहे, अशी माहिती पुणे जिल्हा परिषदेचे उप मुख्यकार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) राहुल गावडे यांनी दिली. (ZP Pune Bharti 2023 | Zilla Parishad Pune Recruitment 2023)
आयबीपीएस कंपनीमार्फत ही सर्व प्रक्रिया राबविण्यात येत असून, अर्ज करण्यासाठी 5 ते 25 ऑगस्ट अशी मुदत देण्यात आली आहे. ऑनलाइन अर्ज पुणे जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर करावे लागणार आहे. अर्ज केल्यानंतर पात्र उमेदवारांची ऑनलाइन परीक्षा होणार आहे.