Maharashtra Local Body Election : जिल्हा परिषद, पंचायत समिती, महापालिकांच्या निवडणूकांचा धुरळा उडणार सप्टेंबर- ऑक्टोंबरमध्ये ?

Maharashtra Local Body Election : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका लांबल्या आहेत. त्यामुळे सध्या सर्व ठिकाणी प्राशसक राज आहे. परंतु आता राज्य निवडणूक आयोगाच्या एका पत्राने रखडलेल्या महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषदांच्या निवडणुका सप्टेंबर- ऑक्टोंबरमध्ये होण्याचे संकेत मिळाले आहेत. (Zilla Parishad, Panchayat Samiti, municipal elections will be held in September-October?)

 

 

राज्यातील 23 महानगरपालिका, 207 नगरपालिका, 25 जिल्हा परिषदा, 284 पंचायत समिती अशा सगळ्या निवडणुका घ्यायच्या आहेत.यातूल बहुतांश संस्थाचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने सुमारे दोन वर्षांपासून काही ठिकाणी प्रशासक आहे.

महाविकास आघाडी सरकार असताना निवडणुका घ्यायची तयारी पूर्ण झाली होती. त्यासाठी वार्ड रचना, गट, गण निश्चित झाले होते. तसेच जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि गटांचे आरक्षणही जाहिर झाले होते. मात्र, प्रभाग रचनेविरोधात काहीजण न्यायालयात गेले. त्यामुळे निवडणुका रखडल्या आहेत.

 

 

काय आहे अध्यादेशात

राज्य निवडणूक आयोगाने राजपत्र प्रसिद्ध केले असून, त्यात क्रमांक रानिआ / ग्रापनि – २०२२/ प्र.क्र. १२/का-८.मुंबई महानगरपालिका अधिनियम, १८८८ (१८८८ चा मुंबई ३) च्या कलम १९(१) ब), महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम, १९४९ (१९४९ चा मुंबई अधिनियम क्र. ५९) मधील कलम ७-अ, महाराष्ट्र नगरपरिणदा, नगरपेंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ (१९६५ चा महा. ४०) च्या कलम १९, महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या अधिनियम, १९६१ (१९६२ चा महा. ५) च्या कलम १३ तसेच महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, १९५८ (१९५९ चा मुंबई अधिनियम क्रमांक ३) चे कलम १२ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून, दिनांक १ जुलै, २०२३ या दिवशी अस्तित्वात असलेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या मतदार याद्या  माहे सप्टेबवर २०२३ ते ऑक्टोबर २०२३ या कालावधीत होणाऱ्या महानगरपालिका, नगरपरिषदा /नगरपंचायती, जिल्हा परिषदा व पंचायत समित्या तसेच ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक/पोटनिवडणुकासाठी मतदार याद्या तयार करण्यासाठी वापरण्यात येतील, असे अधिसूचित करण्यात येत आहे.

 

Local ad 1