...

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक  : इच्छुक लागले कामाला, जिल्ह्यातील 30 कार्यकर्त्यांची होणार  ‘सोय’

नांदेड : विधानसभा निवडणुकांची (Assembly elections) रंगीत तालीम ठरणाऱ्या आणि मिनी मंत्रालय म्हणून ओळख असणाऱ्या जिल्हा परिषदेच्या रणसंग्रामाचे पडघम वाजू लागले आहेत. राजकीय हालचाली लक्षात घेता निवडणुका मे महिन्याच्या मध्यावर लागणार अशी शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, ओबीसी आरक्षणाशिवाय (OBC reservation) निवडणुका नको, अशी भूमिका राज्य सरकारने (State Government) घेतल्याने निवडणुका लांबणीवर पडल्या. त्यातच सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) निवडणुका घ्या, असे बजावले. त्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने (State Election Commission) तयारी सुरु केली आहे. (Zilla Parishad and Panchayat SamitiZilla Parishad and Panchayat SamitiZilla Parishad and Panchayat Samiti)

 

नांदेड जिल्ह्यातील जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणांची संपूर्ण प्रभाग रचना पहा

 

राज्यातील 25 जिल्हा परिषद आणि पंचायत समितींची (Zilla Parishad and Panchayat Samiti) प्रारूप प्रभाग रचना गुरुवारी प्रसिद्ध केले आहे. त्यामुळे आता निवडणूक प्रक्रियेला वेग आल्याचे दिसून येत आहे. तसेच आमागी  निवडणुकीसाठी गट आणि गणांचा पुनर्रचना केली आहे. त्यामुळे गट आणि गणांची संख्या वाढला आहे. नांदेड जिल्ह्यामध्ये 2017 साली पार पडलेल्या निवडणुकीमध्ये जिल्हा परिषदेचे 63 गट होते. तर पंचायत समिती गणांची संख्या 126 होती. या दोन्ही प्रकारात आता अनुक्रमे दहा आणि वीस ने वाढली. त्यामुळे तीस इच्छुक सदस्य म्हणून पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेत जाणार आहेत. (Zilla Parishad, Panchayat Samiti started working for elections)

 

शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी :  बियाणे, खते व किटकनाशकांची खरेदी करतांना काळजी घ्यावी

 जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. आगामी निवडणुकीसाठी गट आणि गणांची पुनर्रचना करण्यात आली. त्यात गटांची संख्या 10  तर गण 20 ने वाढली आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत एकूण 30 इच्छुकांची  ‘सोय’ होणार आहे. (Zilla Parishad, Panchayat Samiti started working for elections)

 

 

Zilla Parishad groups । तुमच्या जिल्ह्यात जिल्हा परिषद गट किती वाढणार जाणून घ्या…

 

 

नांदेड जिल्हा परिषदेवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता राहिलेली आहे. आगामी निवडणुकीत राज्यातील महाविकास आघाडीचा फार्म्युला वापरला जातो की, एकला चलो रे हे पाहणे महत्वाचे आहे. गेल्या निवडणुकीत सर्वाधिक 28 सदस्य काँग्रेसचे होते. आता महाविकास आघाडीमध्ये असलेल्या राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे प्रत्येकी दहा सदस्य होते. भाजपचे 13 तर राष्ट्रीय समाज पक्षाचे दोन असे पक्षिय बलाबल होते. जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीला सोबत घेऊन काँग्रेसने पाच वर्ष जिल्हा परिषदेवर वर्चस्व ठेवले. (Zilla Parishad, Panchayat Samiti started working for elections)

 

जिल्हा परिषद गट (कंसात गण)

माहुर -३ (६), किनवट – ७ (१४), हिमायतनगर – ३ (६), हदगांव – ७ (१४), अर्धापूर  -३ (६), नांदेड – ५ (१०), मुदखेड – ३ (६), भोरक  – ३ (६), उमरी – २ (४), धर्माबाद – २ (४), बिलोली -४ (८), नायगांव  -५ (१०), लोहा -६ (१२), कंधार -७ (१७), मुखेड – ८ (१६) आणि देगलूर -५ (१०).

जिल्हा परिषदेतील पक्षीय बलाबल

  • २८ – कॉंग्रेस
  • १० – राष्ट्रवादी कॉंग्रेस
  • १० – शिवसेना
  • २ – राष्ट्रीय समाज पक्ष
  • १३ – भाजपा
  • ६३ – एकूण सदस्य
Local ad 1