जिल्हा परिषद, महापालिका निवडणुक अपडेट
नवी दिल्ली : राज्यातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात सर्वच्च न्यायालयात (Supreme Court) महत्वाची सुनावणी झाली.त्यात ज्या भागात पाऊस नसेल, त्याठिकाणाच्या निवडणुका घ्या, असे निर्देश दिले आहेत. त्यामुळे आता राज्यातील जिल्हा परिषद, महापालिका आणि पंचायत समितीच्या निवडणुका या टप्प्या-टप्प्याने होतील, अशी शक्यता आहे. (Zilla Parishad, Municipal Election Update)
येत्या काही दिवसांत पावसाळा सुरु होईल याच दरम्यान राज्यातील निवडणुका पार पडणार आहेत. पण निवडणुकांमध्ये अडथळा निर्माण होऊ नये यासाठी ज्या ठिकाणी पाऊस नसेल तिथं निवडणुका घ्यायला काय हरकत आहे? असा सवाल न्यायालयाने उपस्थित केला. जिथे पाऊस नसेल तिथं आधी निवडणुका होण्याची शक्यता आहे. (Zilla Parishad, Municipal Election Update)
राज्यात जिथे पाऊस तिथे पावसाळ्यानंतर निवडणुका घ्या, पण जिथे पाऊस कमी तिथे मात्र निवडणुका लांबवण्याची गरज नाही. जिल्हानिहाय, प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेनुसार पावसाळ्याची स्थिती लक्षात घेऊन निवडणूक आयोगाने कार्यक्रम जाहीर करावा, असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.