जिल्हा परिषद गट, पंचायत समिती गणांच्या आरक्षण सोडतीची तारीख जाहीर

zilla parishad election update : राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू होणार आहे. त्याची प्रशासनाकडून प्रशासकीय तयारी केली जात आहे. आत्तापर्यंत अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध करण्यात आली असून, आता आरक्षण सोडतीकडे राजकीय पक्ष आणि इच्छुकांचे लक्ष लागले आहे. राज्य निवडणूक आयोगाने आरक्षण सोडतीची तारीख जाहीर केली आहे. (Zilla Parishad Group, Panchayat Samiti Gana reservation draw date announced)

 

 

राज्यात सर्व जिल्ह्यांत 13 जुलै रोजी आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. त्यात जिल्हा परिषद गटांची जिल्हाधिकारी कार्यालयात तर पंचायत समिती गणांची आरक्षण सोडत तहसीलदार यांच्या उपस्थित होणार आहे. (Zilla Parishad Group, Panchayat Samiti Gana reservation draw date announced)

 

 

महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक 2022 साठी निर्वाचन गट आणि गणांची प्रभाग रचना अंतिम झाली आहे. आता आरक्षण सोडत 13 जुलै रोजी काढली जाणार आहे. त्यात अनुसूचित जाती (महिला), अनुसूचित जमाती (महिला) व सर्वसाधारण महिला यांच्याकरिता आरक्षण सोडतीची सूचना 7 जुलैला प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यानंतर 13 जुलै रोजी जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत जिल्हा परिषद गट आणि तहसीलदार यांच्या उपस्थितीत पंचायत समिती गणांची आरक्षण सोडत काढली जाणार आहे.

 

जिल्हाधिकारी 15 जुलै रोजी आरक्षणाची प्रारूप अधिसूचना प्रसिद्ध करणार आहेत. 15 ते 21 जुलै दरम्यान, आरक्षणावर हरकती व सूचना मागविण्यात येणार आहेत. 25 जुलैला आरक्षणावर प्राप्त झालेल्या हरकती व सूचना राज्य निवडणूक आयोगाला सादर केल्या जातील.  (Zilla Parishad Group, Panchayat Samiti Gana reservation draw date announced)

 
Local ad 1