मराठवाड्यात सर्वाधिक जिल्हा परिषद गट नांदेडमध्ये

औरंगाबाद : ओबीसी आरक्षणामुळे (OBC reservation) जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या पंचवार्षिक निवडणुका (Five year election of Zilla Parishad and Panchayat Samiti) लांबणीवर पडल्या आहेत. राज्याच्या ग्राम विकास विभागाने (State Rural Development Department) जिल्हा परिषद गटांची संख्या निश्‍चित केली आहे. मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांपैकी सर्वाधिक 73 जिल्हा परिषद गट नांदेड जिल्ह्यात आहे. तर सर्वात कमी 57 गट हिंगोली जिल्ह्यात आहेत. (The highest Zilla Parishad group in Marathwada is in Nanded)

 

ग्रामीण विकास विभागाने आज जिल्हा परिषद गटांची संख्या निश्चित करण्यासंदर्भातील अध्यादेश जारी केला. प्रत्येक जिल्हा परिषदेसाठी त्या जिल्ह्यामध्ये किती गट असतील यांची संख्या जाहीर केली आहे. एका जिल्हा परिषद गटामध्ये पंचायत समित्यांचे दोन गण आहेत. राज्य शासनाने जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गण यांची संख्या वाढविण्याचा निर्णय घेतल्यानंतर जास्तीत जास्त 75 गटांची संख्या आता 85 पर्यंत गेली आहे, तर कमीतकमी पन्नास गट असणार्‍या जिल्हा परिषद सदस्यांची संख्या आता 57 झाली आहे. गटरचनेचे संपूर्ण अधिकार राज्य शासनाला प्राप्त झाल्याने ही अधिसूचना करण्यात आली आहे.  (The highest Zilla Parishad group in Marathwada is in Nanded)

मराठावड्यातील आठ जिल्ह्यांचा विचार केल्यास नांदेड जिल्ह्यात गटांची संख्या सर्वाधिक 73 आहे. गत पंचवार्षिक निवडणुकीत 63 होती. औरंगाबाद जिल्ह्यात 70, जालना 63, परभणी 60, बीड 69,  उस्मानाबाद 61, लातूर 66 आणि  हिंगोली जिल्ह्यात 57 गट असणार आहेत. (The highest Zilla Parishad group in Marathwada is in Nanded)

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या कार्यकर्त्यांनी नागरिकांच्या अडीअडचणी सोडवायला सुरुवात केली होती. सुख-दुःखात सहभागी होणार्‍या अनेक इच्छुकांनी युटर्न घेतला आहे. निवडणुका लांबणीवर पडल्याने इच्छुकांनी खर्चाच्या बाबतीत हात अखडता घेतला आहे.  (The highest Zilla Parishad group in Marathwada is in Nanded)

Local ad 1