...

Zilla Parishad Bharti 2023। जिल्हा परिषद नोकर भरती अभ्यासक्रमात झाला बदल ; काय ते जाणून घ्या

Zilla Parishad Bharti 2023  :  जिल्हा परिषदेमधील कर्मचारी भरती (Zilla Parishad Bharti 2023) करिता अभ्यासक्रम निश्चित करण्यात आला आहे. मुंबईत झालेल्या बैठकीमध्ये प्रत्येक कर्मचारी संवर्गनिहाय अभ्यासक्रमाचे स्वरूप निश्चित करण्यात आले आहे. कनिष्ठ सहाय्यक (Junior Asst) या पदासाठी यापूर्वी असणारी  मॅट्रिक उत्तीर्ण (Passed Matric) ही शैक्षणिक पात्रता बदलण्यात येऊन आता त्यासाठी पदवी परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक करण्यात आले आहे. (Syllabus fixed for Zilla Parishad employee recruitment 2023)

 

 

अभ्यासक्रमातील बदल सविस्तर जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्विक करा

Zilla Parishad (ZP) Recruitment 2023

 

 

  जिल्हा परिषदेतील कर्मचारी भरतीला (Zilla Parishad (ZP) Recruitment 2023) येत्या जुलै अखेरीस सुरुवात केली जाणार आहे. 2014 पासून जिल्हा परिषद कर्मचारी भरतीसाठी अभ्यासक्रम निश्चित नव्हता. यामध्ये अनेक बदल झाले असल्याने शासनाने अभ्यास क्रम निश्चित करण्यासाठी समिती नियुक्त केली होती. या समितीची बैठक मंगळवारी मंत्रालयात झाली. एकूण सर्व 27 संवर्गासाठी अभ्यास निश्चित करण्यात आला आहे सर्वाधिक लक्ष लागलेल्या आरोग्य सेवक या पदाकरता अभ्यासक्रमात कोणताही बदल सुचवण्यात आलेला नाही. पुरुष आरोग्य सेवका संदर्भात घेण्यात येणाऱ्या निर्णयाकडे उमेदवारांचे लक्ष लागले होते.

 

 

कनिष्ठ सहाय्यक या पदाकरिता यापूर्वी मॅट्रिक उत्तीर्ण अशी शैक्षणिक पात्रता होती त्यामध्ये बदल करून आता या संवर्गासाठी पदवी परीक्षा उत्तीर्ण असावी लागेल. याशिवाय अन्यसंवर्गासाठी शैक्षणिक पात्रता यापूर्वीच निश्चित करण्यात आलेली आहे.

 

जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या प्रत्येक संवर्गासाठी स्वतंत्र परीक्षा स्वतंत्र दिवशी घेतली जाईल. जुलै महिन्याच्या शेवटी पहिल्या संवर्गाची परीक्षा घेतली जाईल. परीक्षेसाठी असणारा अभ्यासक्रम अगोदर जाहीर केला जाणार आहे. ही भरती प्रक्रिया डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे.

 

 परीक्षेसाठी जिल्हा परिषदेने आयबीपीएस ही एजन्सी नियुक्ती केली आहे. शासनाने संवर्गनिहाय परीक्षेचा अभ्यासक्रम निश्चित केल्याने आता परीक्षेचा पेपर काढणे आणि पेपर तपासणी तसेच अनुषंगिक कार्यवाही या एजन्सी मार्फत होणार आहे. (Syllabus fixed for Zilla Parishad employee recruitment 2023)
Local ad 1