पुण्यात ‘नोकरी द्या, नशा नाही’ अशी मागणी करणारे युवक काँग्रेसच्या कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात
पुणे : महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने रविवारी पुण्यात “नोकरी द्या, नशा नाही! ” या मागणीसाठी आंदोलन केले. बेरोजगारी व तरुणाईच्या वाढत्या समस्या यावर केंद्र व राज्य सरकारला जाब विचारण्यासाठी युवक काँग्रेसचे हजारो कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. भारतीय युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय भानू चिब (Uday Bhanu Chib, National President of Indian Youth Congress) यांच्या प्रमुख उपस्थितीत, आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, नशा नको, नोकरी द्या, अशी मागणी करणाऱ्या 27 कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यामुळे आंदोलनाच्या ठिकाणी काहीकाळ तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. (Youth Congress activists demanding ‘jobs, no drugs’ in Pune, taken into police custody)
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed