...

पुण्यात ‘नोकरी द्या, नशा नाही’ अशी मागणी करणारे युवक काँग्रेसच्या कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात

पुणे : महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने रविवारी पुण्यात “नोकरी द्या, नशा नाही ! ” या मागणीसाठी आंदोलन केले. बेरोजगारी व तरुणाईच्या वाढत्या समस्या यावर केंद्र व राज्य सरकारला जाब विचारण्यासाठी युवक काँग्रेसचे हजारो कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. भारतीय युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय भानू चिब (Uday Bhanu Chib, National President of Indian Youth Congress) यांच्या प्रमुख उपस्थितीत, आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, नशा नको, नोकरी द्या, अशी मागणी करणाऱ्या 27 कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यामुळे आंदोलनाच्या ठिकाणी काहीकाळ तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. (Youth Congress activists demanding ‘jobs, no drugs’ in Pune, taken into police custody)

 

 

युवक काँग्रेसच्या नेतृत्वाखालील हा मोर्चा काँग्रेस भवन, पुणे येथून निघाला आणि डेक्कन परिसराच्या दिशेने पुढे जाऊ लागला, मात्र बालगंधर्व चौकात पोलीस प्रशासनाने मोर्चाला अडवले आणि मोठ्या संख्येने युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. या अडवणुकीमुळे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आणि त्यांनी बॅरिकेड्स ओलांडण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी आक्रमक होत आंदोलकांना ताब्यात घेतले. यामुळे काही वेळासाठी वातावरण तणावपूर्ण झाले होते.

 

पुणे मनपाच्या क्षेत्रिय कार्यालयांमध्ये बनावट मृत्यू दाखला देणारे रॅकेटचा पर्दाफाश

 

युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय भानू चिब म्हणाले, “देशातील तरुणांना नशेच्या विळख्यात ढकलून बेरोजगार ठेवण्याचे हे सरकारचे षडयंत्र आहे. आम्ही याला कडाडून विरोध करू. सरकारने जर रोजगाराच्या संधी निर्माण केल्या नाहीत, तर युवक काँग्रेस रस्त्यावर उतरून अधिक तीव्र लढा उभारेल. हे सरकार केवळ जाहिराती आणि घोषणा करत आहे, प्रत्यक्षात युवकांसाठी कोणतीही ठोस पावले उचलली जात नाहीत. आम्ही मागे हटणार नाही, युवकांचा हक्क मिळवूनच राहू.

 

Youth Congress activists demanding 'jobs, no drugs' in Pune, taken into police custody

 

 

प्रदेश कार्याध्यक्ष शिवराज मोरे म्हणाले, तरुणांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्या सरकारला आम्ही गप्प बसू देणार नाही. पुण्यातून निघालेली ही चळवळ संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशभरात तीव्र होईल. युवकांना रोजगार न देता सरकार त्यांना व्यसनाच्या दलदलीत लोटत आहे. आम्ही हे चालू देणार नाही. ‘नोकरी द्या, नशा नाही’ हा लढा अधिक तीव्र करू, असे मोरे म्हणाले.

 

लोकशाहीची हत्या करून सत्तेत आलेले केंद्रातील व राज्यातील भाजप सरकार ही लुटारुंची, भांडवलदारांची आणि व्यावसायिकां मदत करुन देशाला ओरबाडण्याचे काम भाजप सरकारकडून सुरु आहे. सर्वसामान्यांच्या प्रश्नांशी, तरुणांच्या बरोजगारी, भविष्याविषयी सरकारला कुठलीच आस्था नाही. गुजरातमधून पुरवठा केल्या जाणाऱ्या अमली पदार्थांच्या नशेत तरुणाईला बरबाद करण्याचे षडयंत्र सुरु असून, देशाचं वाटोळं करण्याचे काम भाजप सरकार करत आहे, असा आरोप महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सरचिटणीस रोहन सुरवसे पाटील यांनी केला आहे.

 

यावेळी प्रदेश प्रभारी अजय चीकारा, अध्यक्ष कुणाल राऊत, एहसान खान, रोहित कुमार, मीडिया विभागाचे अध्यक्ष अक्षय जैन, राज्य सरचिटणीस रोहन सुरवसे पाटील, प्रथमेश आंबनावे, सौरभ आमराळे, उमेश पवार, कौस्तुभ नवले, आनंद दुबे, मेघश्याम धर्मावत अजित सिंग, वैष्णवी किराड, दीपाली ससाणे, प्रथमेष आबनावे,प्रविण बिरादार, श्रीनिवास नालमवार, तारीक बागवान, गणेश उबाळे, आदी उपस्थित होते.

 

आजच्या या आंदोलनात संपूर्ण महाराष्ट्रातून युवक काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले. आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला असला, तरीही युवक काँग्रेसचा लढा अधिक तीव्र होत जाईल, असा इशारा युवक काँँग्रेसचे मिडिया सेलचे अध्यक्ष अक्षय जैन यांनी दिला आहे.

 

Local ad 1