Nanded News । रेणुकामातेच्या दर्शनासाठी ‘रोप वे’ ने जाता येणार

Nanded News। नांदेड : साडेतीन शक्तीपिठांमध्ये समावेश असलेल्या रेणुकामातेच्या मंदिरात  ‘रोप वे’ ने जाऊन दर्शन घेण्याचे भाविकांचे स्वप्न लवकर पूर्णत्वास येणार आहे. ही कामे पूर्ण झाल्यानंतर विशेषतः वयोवृद्ध भाविकांचा त्रास कमी होणार असून, माहूर गडाला भेट देणार्‍या नागरिकांमध्ये मोठी वाढ होणे अपेक्षित आहे. (You can go by ‘Rope Way’ to visit Renukamata)

रेणुकामातेचे देवस्थान असलेल्या माहूर गडावर ’रोप वे’ (‘Rope way’ on Mahur fort) उभारले जाणार आहे. यासंर्भात राज्य शासनाचा सार्वजनिक बांधकाम विभाग आणि वॅपकॉस लिमिटेडमध्ये  (Public Works Department and Wapcos Ltd.) करार झाला आहे. यामुळे  माहूर गडावर होणार्‍या  ‘रोप वे’च्या कामाला गती मिळणार आहे. (You can go by ‘Rope Way’ to visit Renukamata)

 

सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण (Public Works Minister Ashok Chavan) बांधकाम विभागाच्या औरंगाबाद विभागाचे मुख्य अभियंता दिलीप उकिर्डे आणि वॅपकॉसचे प्रतिनिधी दीपांक अग्रवाल यांनी करारावर स्वाक्षरी केली. माहूर गड येथील रेणुकादेवी मंदीर, श्री दत्त शिखर मंदिर, अनुसया माता मंदिरासाठी ’रोप वे’ उभारले जाणार आहे. तसेच रेणुकादेवी मंदिरासाठी फुट ओव्हर ब्रीज आणि लिफ्ट उभारण्याच्या कामाला केंद्रीय मार्गनिधी अंतर्गत सुमारे 51 कोटी रूपयांच्या निधीला मंजुरी मिळालेली आहे. या विकास कामाबाबतच्या करारावर स्वाक्षरी झाल्याने त्यातून या तीर्थक्षेत्राच्या विकासासमवेत जिल्ह्यातील पर्यटन स्थळाच्या विकासालाही आता गती मिळेली आहे.

 

 

Web Title : You can go by ‘Rope Way’ to visit Renukamata

 

Local ad 1