Yellow Alert again । पुन्हा नांदेड जिल्ह्यात यलो अर्लट ; तीन दिवस पावसाचे

नांदेड : मान्सून परत गेला, परंतु पुन्हा नांदेड जिल्ह्यात येत्या 3, 4 व 5 नोव्हेंबर हे तीन दिवस नांदेड जिल्ह्यासाठी यलो (Yellow) अलर्ट जारी केला आहे. त्यानुसार 3, 4 व 5 नोव्हेंबर 2021 रोजी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वारे, विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता मुंबई प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्राने वर्तविले आहे. (Yellow Alert again in Nanded district; Three days of rain)

 

 

यंदा अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. पुन्हा पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आले आहे.  (Yellow Alert again in Nanded district; Three days of rain)
वादळ, मेघ गर्जना आणि आकाशात विजा चमकत असताना : काय करावे आणि काय करु नये यात या गोष्टी करा- विजेच्या गडगडाटासह पावसाची पूर्वकल्पना असल्यास बाहेर जाणे टाळा. जर मोकळ्या जागेत असाल आणि जवळपास कुठल्याही सुरक्षित इमारतीचा आसरा नसेल तर सखल जागेत जाऊन गुडघ्यात डोके घालून बसा. आकाशात विजा चमकत असल्यास घरात किंवा सुरक्षित इमारतीत आश्रय घ्या. घराच्या बाल्कनी, छत अथवा घराबाहेरील ओट्यावर थांबू नका. आपण घरात असाल आणि घरातील विद्युत उपकरणे चालू असतील तर त्या वस्तू त्वरित बंद करा. तारांचे कुंपण, विजेचे खांब व इतर लोखंडी वस्तूंपासून दूर रहा. पाण्यात उभे असाल तर तात्काळ पाण्यातून बाहेर पडा. (Yellow Alert again in Nanded district; Three days of rain)
Local ad 1