Yavatmal ACB Trap । यवतमाळ : वडीलाच्या नावे असलेले स्वस्त धान्य दुकान तक्रारदार मुलगा याच्या नावे करण्यासाठी तहसील कार्यालयात अहवाल सादर करण्यासाठी पुरवठा निरिक्षक चांदणी शेषराव शिवरकर (वय 32 ) यांनी 20 हजार रुपयांची लाच मागितली. त्यातील दहा हजार पुर्विच घेतली. उर्वरित दहा हजार रुपये देण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे तगादा लावला. परंतु तक्रारदार यांना लाच देण्याची इच्छा नव्हती. त्यामुळे त्यांनी थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या 164 टोल फ्री नंबर वर फेना केला आणि चांदणी मॅडमचा करेक्ट कार्यक्रम झाला. (Yavatmal ACB Trap 10 हजार रुपयांची लाच स्विकारणारी महिला पुरवठा निरिक्षक अटक)
सदर कारवाई अमरावती परिक्षेत्र लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पोलीस अधीक्षक मारुती जगताप, अप्पर पोलीस अधीक्षक अरुण सावंत, पोलीस उपाधीक्षक संजय महाजन, शिवलाल भगत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. (Female supply inspector arrested for accepting bribe of Rs 10 thousand)