Related Posts
मुंबई, नागपूर आणि कोकण विभागात त्यांनी प्रांत अधिकारी, अप्पर जिल्हाधिकारी म्हणून काम केले. त्यानंतर पुणे महानगरपालिकेत ते उपायुक्त होते. गेल्या तीन वर्षापासून ते यशदामध्ये निबंधक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये अनेक महत्त्वपूर्ण कामे केली आहेत. पुणे महापालिकेत उपायुक्त प्रशासन या पदावर असताना त्यांनी कर्मचाऱ्यांचा आकृतिबंध व अधिकारी कर्मचाऱ्यांचे सेवा विषयक अनेक प्रश्न मार्गी लावले. यशदामध्ये ही त्यांनी यशदाच्या नियामक मंडळाचे सचिव म्हणून काम पाहिले आहे. यशदामध्ये प्रशिक्षणाचा दर्जा सुधारण्यामध्येही त्यांनी मौलिक भूमिका बजावली आहे. एकंदरीतच यशदाच्या विकासामध्ये तीन वर्षांमध्ये त्यांनी भरीव योगदान दिले आहे. अत्यंत तत्पर, कार्यक्षम आणि हुशार अधिकारी अशी त्यांची ओळख आहे. त्यांना या सेवेत पदोन्नती मिळाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

https://www.mhtimes.in Read Marathi News In Maharashtra At Your Finger Tips.