...

पुणे पोलीस भरती : ‘या’ तारखेला 214 जागांसाठी होणार लेखी परीक्षा

पुणे pune news :  पुणे पोलिस दलात रिक्त असलेल्या (Pune Police Recruitment) शिपाईपदासाठी येत्या ५ ऑक्‍टोबर रोजी लेखी परीक्षा होणार आहे. (There will be a written test) त्यात 214 जागांसाठी ३९ हजार ३२३ उमेदवारांनी अर्ज केले असून, २२ सप्टेंबरपासून उमेदवारांना ऑनलाइन प्रवेशपत्र मिळणार आहेत. (There will be a written test for Pune Police recruitment)

 

 

पुणे पोलिस दलात रिक्त असलेल्या २१४ जागांसाठी २०१९ मध्ये जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. परंतु कोरोनामुळे मागील दीड वर्षापासून ही भरतीप्रक्रिया रखडली होती. आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने ही प्रक्रिया पुन्हा सुरु झाल्याने उमेदवारांन दिलासा मिळाला आहे.

 

 

तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख (The then Home Minister Anil Deshmukh) यांनी राज्यातील १२ हजार ५३८ पदांसाठी पोलीस भरती प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याची घोषणा केली होती. त्यात पहिल्या टप्प्यात ५ हजार ३०० जागांसाठी भरती प्रक्रिया पार पडेल. तर उर्वरित जागा या दुसऱ्या टप्प्यात भरण्यात येतील, असे त्यावेळी देशमुख यांनी स्पष्ट केले होते. त्यातच मराठा आणि आता ओबीसी आरक्षणाच्या तिढ्यामुळे ही भरती प्रक्रिया लांबणीवर पडली आहे. (There will be a written test for Pune Police recruitment)

 

 

कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने आता या प्रक्रियेला वेग आला आहे. राज्य सरकारच्या निर्णयानुसार पोलिस भरतीत शारीरिक चाचणी अगोदर पहिल्यांदाच लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. पोलिस महासंचालक कार्यालयाकडून खासगी यंत्रणेमार्फत ही परीक्षा घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार तयारी सुरू आहे.

 

या परीक्षेसाठी २२ सप्टेंबरपासून उमेदवारांच्या ई-मेलवर आलेल्या लिंकवर प्रवेशपत्र मिळू शकेल. परीक्षेत कोणत्याही प्रकारे गैरप्रकार घडू नयेत, यासाठी सीसीटीव्ही, बायोमेट्रीक सुविधा, व्हिडिओ चित्रीकरणवर भर दिला जाणार आहे. शहरात विविध भागांत १४३ केंद्रावर ही परीक्षा होणार आहे. (There will be a written test for Pune Police recruitment)

लेखी परीक्षा : ५ ऑक्‍टोबर
परीक्षेची वेळ : सकाळी ११ ते दुपारी १२.३०

 

 

 भरतीची वैशिष्ट्ये

उमेदवार : ३९ हजार ३२३
परीक्षा केंद्र : १४३
परीक्षा कक्ष : २१९८
एका कक्षातील उमेदवारांची क्षमता : २४

 

प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी…
https#://mahapolicerc.mahaitexam.in/Phaseone या लिंकवर युझरनेम आणि पासवर्ड वापरून लॉगइन केल्यानंतर प्रवेशपत्र डाउनलोड करता येईल. तसेच ॲप्लिकेशन आयडी, आधार कार्ड, मोबाईल क्रमांक, जन्म तारीख अर्जात भरल्याप्रमाणे टाकूनही प्रवेशपत्र मिळवता येईल.

Local ad 1