चिंताजनक बातमी : जिल्ह्यात 147 कोरोना बधित आढळले

नांदेड :  जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 1363 अहवालापैकी 147 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 122 तर अँटिजेन तपासणीद्वारे 25 अहवाल बाधित आला आहे. त्यामुळे दररोज शहरासह ग्रामीण भागात कोरोना रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक आहे. (Worrying news: 147 corona found infected)

 

जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 90 हजार 981 एवढी झाली असून यातील 87 हजार 917 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 409 रुग्ण उपचार घेत असून 4 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. (Worrying news: 147 corona found infected)

 

जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. (Worrying news: 147 corona found infected)

Local ad 1