...

World Hypertension Day २०२२ : उच्च रक्तदाबामुळे चिंता वाढतेय, काय म्हणतात डाॅक्टर जाणून घ्या…

World Hypertension Day २०२२ : धकाधकीचे जीवन, करिअरमधील स्पर्धा, ताणतणाव, कोरोनामुळे गेलेला रोजगार यामुळे खूप कमी वयातच अनेकांना गंभीर आजारांचे निदान होत आहे. हल्ली तरुणांमध्ये जास्त प्रमाणात उच्च रक्तदाबाचा त्रास (High blood pressure) आढळून येत आहे. उच्च रक्तदाब हा सायलेंट किलर आजार (High blood pressure is a silent killer disease) असून, बहुतांश लोकांमध्ये याची लक्षणे दिसत नाहीत. वेळीअवेळी खाणे, ताणतणाव यामुळे उच्च रक्तदाबाची (World Hypertension Day २०२२) समस्या निर्माण होते. हा आजार कोणत्याही व्यक्तीला होऊ शकतो. उच्च रक्तदाबाच्या समस्येमुळे अन्य आजारांना आयते निमंत्रण मिळते. या आजारामुळे हृदय, किडनी, मेंदू इत्यादी महत्त्वाच्या अवयवांचे आरोग्य धोक्यात येते. (High blood pressure increases anxiety, find out what the doctor says)

 

रक्तदाब म्हणजे काय? (What is blood pressure?)

संपूर्ण शरीराचे कार्य सुरळीत पार पाडण्यासाठी आपलं हृदय आणि मेंदूचे आरोग्य निरोगी असणं आवश्यक आहे. रक्ताभिसरणाच्या प्रक्रियेत हृदयाची महत्त्वाची भूमिका असते. हृदयाच्या स्पंदनांमुळे रक्तवाहिन्यांच्या माध्यमातून आपल्या सर्व अवयवांना रक्तपुरवठा होत असतो. ज्या गतीनं रक्तवाहिन्यांमधून रक्त वाहते, त्या प्रक्रियेस रक्तदाब असे म्हणतात. या आजारासंदर्भात लोकांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी दरवर्षी १७ मे रोजी ‘वर्ल्ड हायपरटेंशन डे’ (World Hypertension Day) साजरा केला जातो.

 

उच्च रक्तदाबाची कारणे (Causes of high blood pressure)

पौष्टिक आहाराचा अभाव, लठ्ठपणा, अपुरी झोप किंवा झोप कमी असणे, मांसाहाराचे अतिसेवन, तेलकट पदार्थ, तिखट पदार्थ आणि जंक फूडचे अतिरिक्त सेवन, उच्च रक्तदाबाची लक्षणे (Symptoms Of Hypertension), सुरुवातीच्या टप्प्यात काही व्यक्तींमध्ये डोक्याच्या मागील भागात आणि मानेमध्ये तीव्र स्वरुपात वेदना होता, रुग्णांना श्वास घेताना त्रास होत. रक्तदाब वाढल्यानं रुग्णांच्या डोळ्यांना अंधुक दिसत, लघवीद्वारे रक्त बाहेर पडण्याची समस्य, चक्कर येणे, थकवा आणि स्तुती यांसारखे लक्षण, रात्री झोप न येणे. कसा ओळखाल? (How do you know) वयाच्या पन्नाशीपर्यंत सिस्टोलिक रक्तदाब ११० ते १४० असावा, तर डायास्टोलिक रक्तदाब नव्वदपेक्षा कमी असावा. सिस्टोलिक रक्तदाब १४० पेक्षा जास्त आणि डायास्टोलिक रक्तदाब नव्वदपेक्षा जास्त असेल तर संबंधित व्यक्तीला अतिउच्च रक्तदाब (हायपरटेन्शन) असल्याचे निदान केले जाते. तपासणीतून हे समोर येते.

 

काय करावे? (What to do)

उच्च रक्तदाबाकडे दुर्लक्ष केल्यास हृदयविकाराशी संबंधित आजार जडण्याची शक्यता असते. त्यामुळे रुग्णांनी जीवनशैलीशी निगडित आहार, व्यायाम इत्यादी बदल करणे आवश्यक आहेत. तसेच उपचारांमध्ये सातत्य राखणे गरजेचे आहे. सतत ताणतणावात काम करणाऱ्या तरुणांनी ३५ व्या वर्षांनंतर महिन्यातून एकदा रक्तदाब तपासणी केल्यास निदान आणि उपचार योग्यरीत्या होऊ शकतो.

 

हा आजार टाळू शकतो.. (This disease can be prevented)

बदलत्या जीवनशैलीमुळे उच्च रक्तदाबाची समस्या वाढत आहे. या आजारामुळे हृदयविकार (Heart disease), किडनीशी संबंधित आजार (Kidney Diseases), अंधत्व, स्मृतीभ्रंश अशा समस्या उद्भवण्याचा धोका असतो. यामुळे रक्तदाबाची समस्या निर्माण होण्यापूर्वीच काळजी घेतली तर आरोग्याला होणारा गंभीर त्रास टाळला जाऊ शकतो.

 

जोखमीचे घटक (Risk factors)

तरूणांमध्ये वाढता लठ्ठपणा ही चिंतेची बाब असून यामुळे उच्चरक्तदाबाची जोखीम वाढत आहे. तंबाखू सेवन,धुम्रपान आणि चुकीची जीवनशैली देखील मुख्य जोखमीचे घटक ठरू शकतात.ज्यांच्या कुटुंबात उच्च रक्तदाबाचा वैद्यकीय इतिहास आहे,त्यांच्या मते इतरांपेक्षा जास्त जोखीम असू शकते.ज्यांना सध्या उच्च रक्तादाबाचा त्रास नाही,त्यांच्यासाठी चांगली जीवनशैली ही गुरूकिल्ली ठरू शकते.

 

डॉक्टरांना विचारल्याशिवाय औषधे कमी किंवा बंद करू नका (Do not reduce or stop the medication without consulting a doctor)

लोकांना अजूनही उच्च रक्तदाब ही एक सामान्य स्थिती वाटते.खरंतरं आधीच्या काळात वाढत्या वयाशी जोडला जाणारा हा आजार आता तरूणांमध्ये देखील दिसू लागला आहे.अनेकदा उच्च रक्तदाबाची लक्षणे दिसून येत नाहीत.डोळे,मुत्रपिंड व इतर अवयवांवर विपरीत परिणाम होऊ लागल्यावरच लक्षात येते.अनेकदा वैद्यकीय तपासण्या व शिबिरांमधून याचे आकस्मिकपणे निदान होते. – डॉ.अतुल जोशी, फिजिशिय, सह्याद्रि हॉस्पिट, पुणे.

Local ad 1