धक्कादायक ! कुटुंबीयांकडूनच जेष्ठांना मिळते दुय्यम वागणूक ! हेल्पएज इंडियाच्या अहवालातील निष्कर्ष

- ‘वर्ल्ड एल्डर अब्युज अवेयरनेस’ विशेष

World Elder Abuse Awareness 2023 । भारतातील वृद्ध स्त्रियांना सामाजिक, आर्थिक आणि डिजिटल पातळीवर मिळते दुय्यम वागणूक, अवलंबून असल्यामुळे छळात वाढ झाल्याची धक्कादायक माहिती हेल्पएज इंडिया संस्थेच्या अहवालातून समोर आली आहे. (Findings from the HelpAge India report) हेल्पएज इंडियाने संयुक्त राष्ट्रसंघाच्या ‘वर्ल्ड एल्डर अब्युज अवेयरनेस’ (‘World Elder Abuse Awareness’ 2023) दिनाच्या (15 जून) निमित्ताने राष्ट्रीय पातळीवर अहवाल सादर केल आहे. त्यातून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. (Shocking ! Harassment of old women by family!)

 

 

 

मुंबईमध्ये 61 टक्के वृद्ध स्त्रियांकडे कोणत्या तरी स्वरूपाची मालमत्ता असून, त्यात घर, वाहन, शेती किंवा बिगर शेत जमीन यांचा समावेश आहे, तर 39 टक्के स्त्रियांकडे हलवता येण्यासारखे किंवा न येण्यासारखी अशी कोणत्याच स्वरूपाची मालमत्ता नाही. सर्व्हेक्षणात मुंबईतून सहभागी झालेल्या 85 टक्के स्त्रिया कोणत्याच प्रकारचे काम करत नाहीत, तर 13 टक्के स्त्रिया पूर्ण किंवा अर्ध वेळ काम करतात. विशेष म्हणजे, वृद्ध स्त्रियांपैकी काम करणार्‍या 79 टक्के स्त्रियांच्या मते मुंबईतील कामाच्या ठिकाणचे वातावरण स्नेहपूर्ण आहे. वृद्ध स्त्रियांपैकी 70 टक्के स्त्रिया आर्थिकदृष्ट्या सुरक्षित वाटत असल्याचे सांगतात व त्यामागचे प्रमुख कारण मुलांकडून मिळणार पाठिंबा असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

 

महाराष्ट्राच्या इतर भागात 55 टक्के वृद्ध स्त्रियांकडे कोणत्या ना कोणत्या स्वरूपाची मालमत्ता असून त्यात घर आणि जमिनीचा समावेश आहे. मुंबईतील 57 टक्के वृद्ध स्त्रिया समाजात वृद्धांचा शारीरिक हिंसेसह छळ होत असल्याचे मान्य करतात, तर 14 टक्के स्त्रियांनी स्वतः हा छळ अनुभवला आहे. मुलगा, सून आणि इतर नातेवाइकांकडून असा छळ केला जात असल्याचे यात दिसून आले आहे. महाराष्ट्राच्या इतर भागांत 63 टक्के वृद्ध स्त्रिया समाजात छळ अस्तित्वात असल्याचे सांगतात, तर 23 टक्के स्त्रियांनी मुलगा- सुनेसह इतर नातेवाइकांकडून छळ होत असल्याचे मान्य केले. (Shocking! Harassment of senior women by family!)

वैद्यकीय सुरक्षेचा अभाव – Lack of medical security

हेल्पएजच्या अहवालात वृद्ध स्त्रियांमध्ये असलेले परावलंबित्व ठळकपणे मांडण्यात आले आहे. उच्च साक्षरता, कमी आर्थिक सुरक्षा, तक्रार निवारण किंवा लाभदायक योजनांविषयी कमी जागरूकता, रोजगाराच्या संधी आणि वैद्यकीय सुरक्षेचा अभाव इत्यादी घटकांमुळे त्यांचा छळ होण्याची शक्यता जास्त असते. (Shocking! Harassment of old women by family!)

 

मुलांकडूनच सर्वाधिक छळ

अहवालात वृद्ध स्त्रियांचा होणारा छळ धक्कादायक पातळीवर पोहोचला असून 16 टक्क्यांनी वाढत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. पहिल्यांदाच छळाच्या बाबतीत शारीरिक हिंसा सर्वात जास्त होत असल्याचे दिसून आले आहे. 50 टक्के जणींनी छळ अनुभवल्याचे सांगितले असून त्याखालोखाल दर्जाहीन वागणूक (46 टक्के) आणि मानसिक/शारीरिक छळ (40 टक्के) यांचा समावेश असल्याचे दिसून आले आहे. छळ करणार्‍यांमध्ये मुलाचे प्रमाण जास्त (40 टक्के) आहे, तर त्याखालोखाल इतर नातेवाइकांकडून होणारा छळ (31 टक्के) व सुनेकडून होणारा छळ (27 टक्के) दिसून येत आहे.

 

75 टक्के वृद्ध स्त्रियांकडे कसलीच बचत नाही

आर्थिक बाबतीत सांगायचे झाल्यास 53 टक्के वृद्ध स्त्रियांना आर्थिक बाबतीत सुरक्षित वाटत नाही. ज्या 47 टक्के जणींना ‘सुरक्षित’ वाटत त्यापैकी 79 टक्के जणी पैशांसाठी मुलांवर अवलंबून आहेत. भारतातील 66 टक्के वृद्ध स्त्रियांकडे कसलीच मालमत्ता नाही, तर 75 टक्के वृद्ध स्त्रियांकडे कसलीच बचत नाही. डिजिटल उपकरणे (Digital devices) वापरलेली नाहीत डिजिटल (Digital devices) समावेशकतेबद्दल वृद्ध स्त्रिया खूपच मागे आहेत. 60 टक्के वृद्ध स्त्रियांनी कधीच डिजिटल उपकरणे वापरलेली नाहीत, तर 59 टक्के वृद्ध स्त्रियांकडे स्मार्टफोन्स नाहीत. 13 टक्के वृद्ध स्त्रियांनी ऑनलाइन कौशल्य विकास प्रोग्रॅममध्ये (Online Skill Development Program) सहभागी व्हायला आवडेल असे सांगितले. (Shocking! Harassment of old women by family!)

 

 

  • 48 टक्के वृद्ध स्त्रियांना किमान एक तरी गंभीर आजार आहे, तरी 64 टक्के वृद्ध स्त्रियांनी आरोग्य विमा (Health insurance) नसल्याचे सांगितले. 67 टक्के स्त्रिया आजही त्यांच्या कुटुंबाची सर्व जबाबदारी निभावतात, तर 36 टक्के वृद्ध स्त्रियांना ही जबाबदारी पेलवत नाही. (Shocking! Harassment of old women by family!)

 

  • ‘लहान वयापासूनच स्त्रियांना सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक भेदभाव (Economic and educational discrimination) सहन करावे लागतात व त्याचे अतिशय दुर्देवी परिणाम त्यांना वृद्धापकाळात भोगावे लागतात. त्या आपल्या आयुष्यात बरेच काही सहन करतात आणि तरीही आयुष्यात त्यांचे स्थान दुय्यम राहाते.
  • 51 टक्के वृद्ध स्त्रियांनी कधीच नोकरी केलेली नसल्याचे सांगितले, तर 32 टक्के वृद्ध स्त्रियांनी शक्य आहे, तोवर काम करत राहाण्याची इच्छा व्यक्त केली, मात्र त्यांच्याकडे संधी नाहीत. याचाच अर्थ वृद्धापकाळात त्यांच्याकडे अतिशय कमी सामाजिक सुरक्षा असते किंवा पूर्णपणे नसते. त्यांच्यासाठी पूरक वातावरणही तयार केले गेलेले नाही. जवळपास 70 टक्के वृद्ध स्त्रियांनी रोजगाराच्या पुरेशा संधी उपलब्ध नसल्याचे सांगितले. जर तंत्रज्ञान हेच आपले भविष्य आहे, तर या स्त्रियांचे आजच्या डिजिटल युगातील स्थान काय?
    • 59 टक्के वृद्ध स्त्रियांकडे स्मार्टफोन नाही. आजच्या काळात आणि ही 72 टक्के स्त्रियांनी त्या स्वतः स्वतःचे निर्णय घेऊ शकत नसल्याचे सांगितले. आपल्या आयुष्याचे सर्व निर्णय घेणार्‍या आपल्या जोडीदाराच्या निधनानंतर या स्त्रियांना कसे स्वावलंबी होता येईल, त्यासाठी त्यांना कसे प्रोत्साहन देता येईल याविषयी आपण नव्याने विचार करायला हवा,’ असे हेल्पएज इंडियाच्या पॉलिसी आणि रिसर्च विभागाच्या प्रमुख अनुपमा दत्ता म्हणाल्या.
    • 47 टक्के वृद्ध आणि नोकरदार स्त्रिया त्यांच्या घरचे वातावरण कामाप्रति पूरक नसल्याचे सांगतात, तर नोकरदार नसलेल्या 36 टक्के वृद्ध स्त्रिया कामाच्या ठिकाणाबद्दल हेच मत व्यक्त करतात. 43 टक्के वृद्ध स्त्रियांना शारीरिक इजा होण्याची भीती वाटते, तर 76 टक्के जणींना पडल्यामुळे तर 46 टक्के स्त्रियांना दृष्टी कमकुवत झाल्यामुळे इजा होण्याची भीती वाटते.
Local ad 1