नायगाव | बलात्कार प्रकरणाच्या आरोपात तुरुंगात असेलला मेळगावचा सरपंच व अतिक्रमण केल्या प्रकरणी एका महिला सदस्याला जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्र ठरविले आहे. या निर्णयाने एकच खळबळ उडाली आहे. Ineligible women members including Sarpanch of Melgaon
Related Posts
नायगाव तालुक्यातील मेळगावची ग्रामपंचायत निवडणूक अतिशय अटीतटीची व चुरशीची झाली होती. त्यानंतर फेब्रुवारी महिण्यात मेळगावच्या सरपंच व उपसरपंचाच्या निवडी झाल्या होत्या. सरपंचपदी अमोल रामानंद महिपाळे यांची निवड झाली तर चंद्रकला प्रदीप धसाडे या ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आल्या होत्या. निवडणुकीत वादविवादानंतर हाणामारीचाही प्रकार घडला होता.
सरपंच अमोल महिपाळे याच्यावर अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा त्यांच्यावर गुन्हा नोंद आहे. तर चंद्रकला धसाडे यांनी ग्रामपंचायतीच्या जागेवर अतिक्रमण केले आहे त्यामुळे या दोघांनाही अपात्र घोषित करण्यात यावे, अशी मागणी विनोद आनंदराव शिंदे यांनी जिल्हाधिकारी नांदेड यांच्या न्यायालयात दाद मागितली होती. या तक्रारीनंतर जिल्हाधिकारी कार्यालयाने सविस्तर चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश गटविकास अधिकारी नायगाव यांना दिला होता. Ineligible women members including Sarpanch of Melgaon
पंचायत समितीच्या प्रत्यक्ष स्थळ पाहाणीत अतिक्रमण झाले असल्याचे गटविकास अधिकारी यांनी दिलेल्या अहवालात स्पष्ठ झाले आहे. त्यामुळे प्रतिवादी यांच्या विरुध्द महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 चे कलम 14 (ज-3) नुसार दाखल केलेला विवाद अर्ज मंजूर करण्यात आला असून, ग्रामपंचायत सदस्या चंद्रकला प धसाडे यांनी ग्रामपंचायतीच्या सार्वजनिक जागेवर अनाधिकृत अतिक्रमण केल्याचे स्पष्ठ झाले. तर सरपंच अमोल महिपाळे यांच्या बाबतीत गटविकास अधिकारी, पंचायत समिती नायगाव यांनी दि. १७ मे रोजी अहवाल सादर केला. त्यात अमोल महिपाळे रा. मेळगाव यांचे शौचालय असून त्यांचे बांधकाम नुकतेच केलेले दिसुन येते. तसेच त्याचा नियमित वापर होत नसल्यामुळे महाराष्ट्र ग्रा.प. अधिनियम १९५८ चे कलम १४ ज (५) चा भंग होतो. असा अहवाल या कार्यालयास सादर केला आहे. Ineligible women members including Sarpanch of Melgaon