पुणे : गडचिरोलीत आदिवासी समुदायात असणाऱ्या कुर्माप्रथेत सकारात्मक बदल व्हावेत यासाठी ‘समाजबंध’ सामाजिक संस्था प्रयत्न करत आहे. त्यासाठीएप्रिलमध्ये भामरागड तालुक्यातील 18 गावात पहिलं आठ दिवसीय निवासी शिबिर राबवले. त्यातील 14 गावांमध्ये हे दुसरे शिबिर राबवण्यात आले. या गावांतील 400 महिलांनी कुर्मा प्रथा (Kurma practice) न पाळण्याची घेतली शपथ घेतली आहे. (Revolutionary step of 400 women in Bhamragarh; He took an oath not to follow the custom of Kurma)
कुर्माघर म्हणजे काय?
- खेळ, स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रबोधन करण्यात आले. मासिक पाळी आणि इतर सामाजिक विषयांवर निबंधलेखन, चित्रकला, वक्तृत्व अशा विविध स्पर्धा आयोजित करत किशोर आणि युवांना बोलते करण्यात आले. या सामाजिक प्रश्नांवर जनजागृती करत महिला आणि किशोर यांची गावागावातून प्रभातफेरी काढण्यात आली. कुर्माप्रथेवर नेमकं भाष्य करणारे नाटक दिवाळीनिमित्त असणाऱ्या कार्यक्रमात गावातील मुलींनी सादर केले.
“आतापर्यंत समाजबंधने काम केलेल्या १९ पैकी १० गावातील महिला, युवावर्ग आणि काही पुरुषही कुर्माप्रथेला मूठमाती देण्याच्या दिशेने वेगाने पाऊले टाकत आहेत; तर शेकडो महिला व मुली पाळीच्या काळात कुर्माघरात न राहता गुपचूप घरात राहत आहेत. याचाच अर्थ या प्रथेतील फोलपणा लोकांच्या ही हळूहळू लक्षात येत आहे. सातत्याने या विषयात काम करत राहिलं तर येत्या १० वर्षात भामरागड मधील परिस्थिती बदलेल याचा आम्हाला विश्वास आहे.” असं समाजबंधच्या प्रशिक्षक शर्वरी सुरेखा अरुण म्हणाल्या.
- अजूनही महाराष्ट्रात कुर्माप्रथेसारखी अनिष्ठ प्रथा सुरु असणं, त्यातून कित्येक महिलांचे बळी जाणं, टोकाची अस्पृश्यता पाळली जाणं हे जितकं वाईट आहे त्याहूनही भयानक हा विषय मुख्य प्रवाही जगाला माहीतच नसणं हे आहे. या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन समाजबंध त्यात करत असलेल्या सकारात्मक हस्तक्षेपास शक्य झाल्यास आपल्या माध्यमातून प्रसिद्धी देऊन बदलाचा हा Approach लोकांसमोर आणावा यासाठी खालील Post पाठवत आहे.