(Woman) दिव्यांग कायद्यानुसार नांदेड जिल्ह्यातील पहिला गुन्हा
नायगाव : आळंदी येथील अपंग व विधवा असलेल्या (Divyang woman) महिलेस उपसरपंचाच्या प्रतिनिधीसह चार जणांनी अश्लिल भाषेत शिवीगाळ करीत मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी दिव्यांग महिलेनी दिलेल्या फिर्यादीवरून चौघा जणांविरुद्ध दिव्यांग कायद्यानुसार जिल्ह्यातील पहिला गुन्हा रामतीर्थ पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.
A disabled and widowed woman from Alandi was threatened with death by four persons, including a sub-panch representative, for using obscene language and beating her. According to a complaint lodged by a Divyang woman, a case has been registered against the first four under the Divyang Act at Ramtirtha police station.
बिलोली तालुक्यातील आळंदी येथील शांताबाई मारुती चिंतले (वय 40) ह्या अपंग आणि विधवा असलेल्या महिलेने (Woman) स्वतःच्या मालकीच्या कायदेशीर जागेत कच्चे बांधकाम करीत होत्या. दरम्यान, गावातील उपसरपंचाचे प्रतिनिधी बाळासाहेब गोविंद चट्टे आणि ग्रामपंचायतीचे सदस्य उज्वल दत्ता चट्टे, विश्वनाथ मसनाजी अबदागीरे, तसेच ब्रम्हानंद अबदागीरे रा. आळंदी ह्या चार जणांनी अपंग विधवा महिलेस तू रस्त्यावर-बांधकाम का करत आहेस, असे म्हणून जाब विचारला. संबंधित विधवा महिलेने माझ्या मालकी व हक्काची जागा असून. रस्ता सोडून बांधकाम करत आहे, असे सांगत असताना या चौघांनी अपंग महिलेस अश्लील भाषेत शिवीगाळ करीत मारहाण केली.
Shantabai Maruti Chintale (age 40), a disabled and widowed woman from Alandi in Biloli taluka, was doing raw construction in her own legal space. Meanwhile, village deputy panch representative Balasaheb Govind Chatte and gram panchayat members Ujwal Datta Chatte, Vishwanath Masnaji Abdagire and Bramhanand Abdagire asked the disabled widow, “Why are you building on the road?” The respective space is owned by the woman.