(wine shop) वाईन शाॅपचा परवाना काढून देण्याच्या बहाण्याने पिता-पुत्राने घातला बारा लाखांना गंडा
पुणे ः राज्य उत्पादन शुल्क विभागाचा आधिकारी असून, किरकोळ मद्यविक्रीचा परवाना (वाईन शाॅप) मिळवून देतो, असे सांगत पिता-पुत्रांनी एकाकडून बारा लाख रुपये उकळले. या प्रकरणी हडपसर पोलिसांनी या बाप-लेकांना अटक केली असून पुणे कोर्टाने 15 जून पर्यंत त्यांची रवानगी पोलीस कोठडीत केली आहे. wine shop: the father and son embezzled Rs 12 lakh
शुभम नंदेश्वर शहा (वय २८, रा. तरडगाव, जि. सातारा) व वडील नंदेश्वर शहा (वय 58) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी करण संजय खुटाळे (वय ३०, रा. तुकाईदर्शन रोड, हडपसर) यांनी हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पुणे उत्पादन शुल्क विभागात अधिकारी असल्याचे भासवून आरोपी बाप-लेकांनी गावात उत्पादन शुल्क विभागातील निरीक्षकांचा ड्रेस घालू मद्य विक्रीचा परवाना मिळवून देण्याचे अमिष दाखविले. त्यासाठी वेळो-वेळी बारा लाख रुपये उकळले. wine shop: the father and son embezzled Rs 12 lakh
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी आणि आरोपी एकाच गावातील रहिवासी आहेत. आरोपी शुभम शहा हा पुण्यात रहात होता. गावी जाताना तो अंगावर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांचा गणवेश घालून जायचा. फिर्यादीला त्याने आपण उत्पादन शुल्क विभागात निरीक्षक असल्याचे सांगितले होते. एकाच गावातील रहिवासी असल्यामुळे फिर्यादीचा देखील त्याच्यावर विश्वास बसला होता. wine shop: the father and son embezzled Rs 12 lakh