मोहरमध्ये मिरवणुका नको ; अशी आहे नियमावली

मुंबई : मोहरमनिमित्त मुस्लिम बांधवांतर्फे वाझ/मजलीस तसेच मातम मिरवणुका काढल्या जातात. परंतु यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने  परवानगी नाकारण्यात आली. (Corona pandemic Maharashtra government issued new guidelines) नियमावली जाहीर केली असून, त्यात मोहरम साध्या पद्धतीने करण्याचे आवाहन गृह विभागाने केले आहे. (procession will not be allowed in Islamic festival Muharram)

 

 

कोरोनाच्या संसर्गापासून विविध उपक्रम, कार्यक्रम, सार्वजनिक उत्सव, सण अत्यंत साधेपणाने साजरे केले जात आहेत. त्याचपद्धतीने  मोहरम साध्या पद्धतीने करण्यासाठी गृह विभागाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. मोहरम महिन्यात (18 आणि 19 ऑगस्ट) ‘कत्ल की रात’ आणि ‘योम-ए-आशुरा’ निमित्ताने मातम मिरवणुका काढण्यात येतात. परंतु सामाजिक व धार्मिक कार्यक्रमांना सध्या बंदी असल्यामुळे सार्वजनिक मातम मिरवणुका काढता येणार नसल्याच्या सूचना गृह विभागाने दिल्या आहे. (procession will not be allowed in Islamic festival Muharram)

 

 

वाझ / मजलीसचा कार्यक्रम शासनाच्या नियमांचे पालन करुन ऑनलाईन पद्धतीने आयोजित करण्यात यावेत. ताजिया / आलम काढू नयेत. सबील / छबील बांधण्यासंदर्भात स्थानिक प्रशासनाची परवानगी घ्यावी. त्या ठिकाणी कोरोना संदर्भात आरोग्याच्या दृष्टीकोनातून नियमांचे तंतोतंत पालन करावे. तसेच सामाजिक अंतर तसेच स्वच्छतेचे नियम (मास्क, सॅनिटायझर इ.) पाळण्याकडे लक्ष देण्यात यावे. (procession will not be allowed in Islamic festival Muharram)

Local ad 1