...

Monsoon tourism in Pune district : पावसाळी पर्यटनासाठी जाणार असाल तर ही माहिती वाचा…

भाग १

Monsoon tourism in Pune district : पुणे शहराजवळ व जिल्ह्यात पावसाळी पर्यटनासाठी जाण्याचा बेत आहे. परंतु त्या ठिकाणांचा अंतर, मार्ग व सांधने माहीत नसते. त्यामुळे पर्यटनासाठी गेल्यानंतर अडचण निर्माण होते. त्यामुळे आम्ही पुणे जिल्ह्यातील महत्वाची पर्यटनस्थळे, तिथे कसे जाल.. (Monsoon tourism in Pune district) हे देण्यासाठी आमचा प्रयत्न आहे. (You will be going for monsoon tourism in Pune district)

 

 

You will be going for monsoon tourism in Pune district

लोणावळा

अंतर : पुण्यापासून रेल्वेने अंतर 64 किमी व रस्त्यावरून 68 किमी
वेळ : रेल्वेने 45 मिनिटात पोहोचता येते. बस किंवा गाडीने सव्वा दोन तासात पोहोचणे शक्य
साधने : पुण्यातून रेल्वे , बस उपलब्ध. स्वत:ची गाडी नेऊ शकतात. रस्ता उत्तम आहे.
आकर्षण : पुणे जिल्ह्यातील एक लोकप्रिय ठिकाण. पावसाळ्यात तर याठिकाणी तीनचार महिने मोठी गर्दी असते. हिरवीगार झाडे, निसर्गशोभा, डोंगरमाथे व दर्या पावसाळयात कडेलोट होऊन कोसळणारे धबधबे यांमुळे येथे पावसाळ्यात जाणे आनंददायी अनुभव ठरतो. (You will be going for monsoon tourism in Pune district)

मुख्य आकर्षण : राजमाची पॉइंट, वळवण धरण, भुशी धरण, टायगर्स लीप, ड्यूक्स अँड डचेस नोज, कार्ला-भाजा येथील लेणी, लोहगड, विसापूर ही त्यापैकी काही ठळक ठिकाणे होत. लोणावळा येथील चिक्की तर सर्वत्र प्रसिद्ध आहे. (You will be going for monsoon tourism in Pune district)

 

 

lavasa

 

लवासा

अंतर : पुण्यापासून सुमारे 60 किमी अंतरावर आहे.
वेळे : दोन ते अडीच तासात पोहोचणे शक्य
साधने : दुचाकी, चारचाकी अथवा कॅबने जाणे सोयीचे
आकर्षण : भारतातील पहिले योजना आखून निर्माण केले गेलेले, डोंगरांच्या मध्यभागी वसवलेले असे हे पर्यटन स्थळ आहे. पावसाळयात कुटुंबासह जाण्यासाठी एक परिपुर्ण ठिकाण म्हणून याचा उल्लेख केला जातो. 25 एकरात वसवलेले हे एक सुंदर छोटेसे शहरच आहे. याठिकाणच्या रस्त्यांवरून पायी फिरणे हा एक सुखद अनुभव असतो. छायाचित्रणासाठी हे एक लोकप्रिय ठिकाण ठरत आहे. हिरव्यागार लँडस्केपसह सात टेकड्यांमधून वसवलेल्या या ठिकाणाला अवश्य भेट द्यायला हवी. (You will be going for monsoon tourism in Pune district)

 

lavasa 1
lavasa 1

 

मोराची चिंचोली

अंतर : 54 किमी शहरापासून
वेळ : 1 तासात आरामात पोहोचता येते.
साधने : बस उपलब्ध आहेत. याशिवाय रस्ते चांगले असल्यामुळे दुचाकी, चारचाकीने ही प्रवास योग्य.
आकर्षण : मोराची चिंचोली पुणे-अहमदनगर महामार्गावरील शिरूरजवळ आहे. अहमदनगर मार्गालागताच डाव्या बाजूस शिक्रापूर फाट्यावरून आत सुमारे 23 कि. मी वर हे मोरांचे गाव वसलेले आहे. या ठिकाणी विपूल प्रमाणात वनसंपदा आहे. मोकळ्या वातावरणात फिरणारे मोर पावसाळी वातावरणात पहायला जाण्यासाठी पर्यटकांची या स्थळाला जास्त गर्दी होते. (You will be going for monsoon tourism in Pune district)

 

OLYMPUS DIGITAL CAMERA

पानशेत

अंतर : शहरापासून 40 किमी अंतरावर
वेळ : साधारण 1 तासात पोहोचता येते.
साधने : दुचाकी, चारचाकी ने जाणे लोक पसंत करतात. बस सेवाही उपलब्ध आहे.

आकर्षन : पुण्याला पाणीपुरवठा ज्या ठिकाणाहून होतो असे पाणशेत धरण आणि बाजूचा परिसर पावसाळ्यात लांबवर हिरवागार दिसतो. आजूबाजूला फुललेली असंख्य रानफुले, डोक्यावर पावसाळी ढग, आजूबाजूला डोंगरावरून कोसळणारे धबधबे शेतामध्ये शेतकर्यांनी केलेली पेरणी असे वातावरण अनुभवायचे असेल तर पुण्याच्या जवळच असणार्या पाणशेत ला आवश्य भेट द्यायला हवी. येथून जवळच तोरणा किल्ला आहे. पानशेत ला स्वत:च्या वाहनाने जाणार असले तरी हा परिसर पायी फिरण्यात खरी मजा आहे. पावसाळ्यात या परिसरात सगळीकडे फुलणार्या पांढर्या फुलांचे ताटवे बघणे, आजूबाजूला कोसळणारे धबधबे, डोंगररांगा या सगळ्यांच्या सोबतीने पावसात चिंब भिजण्याची मजा घेण्यासाठी जवळच असणार्या पानशेतला पर्याय नाही.

 

panshet dam
panshet dam
Local ad 1