...

कसब्याची पोटनिवडणूक का महत्वाची, आदित्य ठाकरेंनी सांगितले कारण

पुणे  ः युवसेना नेते, माजी मंत्री आदित्य ठाकरे (Former Minister Aditya Thackeray) यांच्या रॅलीने पुणे शहरातील वातावरण ढवळून निघाले.  यावेळी आदित्य यांनी कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाची (Kasba Peth and Chinchwad Assembly Constituencies) पोटनिवडणूक का महत्वाची आहे, याची कारण सांगितले आहे.  (Why Kasbya by-election is important, Aditya Thackeray said the reason)

 

 

कसबा विधानसभा पोटनिवडणुकीतील महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ येथील लाल महालापासून रॅलीला सुरुवात झाली. ठिकठिकाणी या रॅलीचे जोरदार स्वागत होत होते. दुतर्फा नागरिकांनी प्रचंड मोठी गर्दी केली होती. फडके हौद- देवजीबाबा मठ- हमजेखान चौक- नाना चावडी चौक हिंदमाता चौक मार्गे साखळीपीर तालीम चौक येथे रॅलीचा समारोप झाला व  सहा वाजता आदित्य ठाकरे यांचे आगमन झाल्यानंतर त्यांनी सर्वप्रथम लाल महालमधील बालशिवाजी व राजमाता जिजाऊ यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

ही निवडणूक संविधान व लोकशाही वाजवणारी ठरणार असून संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या या निवडणुकीचा निकाल तुमच्या विराट प्रतिसादामुळे आताच लागला असल्याची भावना शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी आज येथे केली. कसबा विधानसभा पोटनिवडणुकीतील महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ नाना पेठ येथील साखळीपीर तालीम चौकात झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खासदार श्रीनिवास पाटील, विधानपरिषदेतीलच विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे, शिवसेना नेते सचिन आहेर, चंद्रकांत मोकाटे, मोहन जोशी, उल्हासदादा पवार, अंकुश काकडे, प्रशांत जगताप, बाळासाहेब दाभेकर, रवींद्र माळवादकर, अरविंद शिंदे, संजय मोरे, विशाल धनवडे, रुपाली ठोंबरे, संग्राम थोपटे आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते. या सभेत गर्दीचा उच्चांक मोडला गेला.

या सभेत आदित्य ठाकरे म्हणाले, या सभेला मिळालेला तुमचा इतका प्रचंड प्रतिसाद पाहून ही विजयाचीच सभा असल्याचे वातावरण निर्माण झाले आहे. महाराष्ट्रातील गेल्या काही दिवसाचे राजकारण पाहता ४० गद्दारांनी शिवसेनेचे चिन्ह चोरले, शिवसेनेचे नाव चोरले परंतु अशा कठीण परिस्थितीत महाविकास आघाडीचे कवच धंगेकर यांना लाभले असून, ते निवडून आले आहेत हे सांगायला आता कोंचीच गरज नाही. याच कसब्यातून आदिलशाही व ब्रिटिशांविरुद्ध बंडाची सुरुवात झाली.

महापुरुषांच्या वास्तव्याने पुनीत झालेली ही भूमी गद्दारांचा कडेलोट केल्याशिवाय राहणार नाही, असा मला विश्वास आहे. देशाची दिशा ठरविणारी ही निवडणूक असून या देशात अजूनतरी ‘सत्यमेव जयते’ला महत्त्व आहे. महाराष्ट्राला मागे ओढत येथील भूमिपुत्रांच्या हक्काच्या नोकऱ्या गुजरातला नेणारे हे असंविधानिक मार्गाने सत्तेवर आलेले सरकार घालविण्यासाठी आपण सगळ्यांनी मला साथ द्यावी व या महाराष्ट्राची प्रतिमा व प्रतिष्ठा उंचावण्यासाठी व पुन्हा वैभवाचे दिवस आणण्यासाठी आपण सज्ज होऊ या.

यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची ध्वनिचित्रफित मार्फत मतदारांशी संवाद साधून रवींद्र धंगेकर यांना विजयी कार्याचे आवाहन करून ही निवडणूक सहानुभूतीची नसून टिळकांच्या घराण्यावर अन्याय करत व गंभीर आजारी असणाऱ्या गिरीश बापट यांना ऑक्सिजन सिलेंडर च्या नळ्या लावलेल्या अवस्थेत प्रचारात उतरवून भाजपने आपल्या क्रूरतेचे दर्शन पुणेकरांना दाखवून दिले आहे असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले. (Why Kasbya by-election is important, Aditya Thackeray said the reason)


सभेच्या प्रारंभीच्या भागात आदित्य ठाकरे यांनी समोरच्या जनसमुदायाला उद्देशून ’५० खोके’ असा नारा देताच साऱ्या जनसमुदायातून ‘एकदम ओके’ असा जोरदार प्रतिसाद मिळत राहिला. यामध्ये तरुणांची संख्या फार मोठ्या प्रमाणात होती. (Why Kasbya by-election is important, Aditya Thackeray said the reason)

कॉंग्रेसचे माजी मंत्री सुनिल केदार हे आदित्य ठाकरे यांच्यासमवेत जीपमध्ये बसले होते. फटाक्यांची भव्य आतषबाजी, भगवे फुगे, तसेच भगव्या पताक्यांच्या माळांचा वर्षाव ठिकठिकाणी रॅलीच्या मार्गात होत होता. दुचाकी गाड्यांवरील तरुण-तरुणींनी भगवे कोट परिधान केले होते. (Why Kasbya by-election is important, Aditya Thackeray said the reason)

Local ad 1