सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ प्रशासनाला सावित्रीबाई फुले यांच्या नावाची अलर्जी का?

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ प्रशासनाला सावित्रीबाई फुले यांच्या नावाची अलर्जी असल्याचे आजपर्यंत दिसून आले आहे. हा आनुभव पुन्हा एकदा आला आहे. त्यावर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ प्रशासनाला सावित्रीबाई फुले यांच्या नावाची अलर्जी का? (Why is Savitribai Phule Pune University administration allergic to the name of Savitribai Phule?) असा सवाल विद्यापीठ विद्यार्थ्यी सघर्ष कृती समिती उपस्थित केला आहे. तसेच विद्यापीठ प्रशासनाने लेखी माफी मागावी, अशी मागणीही केली आहे.

 

 

विद्यापीठ विद्यार्थ्यी सघर्ष कृती समितीने विद्यापीठ प्रशासनाला दिलेल्या पत्रात म्हटले की, विद्यापीठाच्या परिसरामध्ये दिनांक १७ ते २२ जून २०२३ या दरम्यान Exhibition on Foundational Learning, Digital Education, Research and Future of Work अशा स्वरूपाच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचा एक प्रोमो व्हिडिओ आयोजकांनी प्रसारमाध्यामावर प्रसिद्ध केला आहे. त्यामध्ये दोन वेळेस ‘पुणे विद्यापीठ’ असा विद्यापीठाचा उल्लेख करून जाणीवपूर्वक सावित्रीबाई फुले यांच्या नावाचा उल्लेख टाळण्याचा टाळण्यात आला आहे.

 

विद्यापीठाचा नामोल्लेख “सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ” (Savitribai Phule Pune University) असाच करणे अनिवार्य आहे. परंतु गेल्या काही दिवसामध्ये सातत्याने सावित्रीबाईच्या नावाचा उल्लेख टाळणे तसेच विद्यापीठ कॅलेंडरमध्ये जयंती व पुण्यतिथीच्या तारखा चुकविणे या सारखे गैरप्रकार मुद्दाम केले जात आहेत. ही बाब अतिशय गंभीर असून, अशा पद्धतीने इतिहासाची मोडतोड करणाऱ्या जबाबदार व्यक्तींवर कठोर कारवाई करण्याची तसेच त्या संबंधित व्यक्तींनी जाहीर लेखी माफीनामा प्रसिद्ध करावा, अशी मागणी विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समितीने निवेदनदाद्वारे केली आहे.

Local ad 1