Why is Maharashtra Day celebrated । स्वातंत्र्यापूर्वी आणि स्वातंत्र्याच्यानंतर काही काळ गुजरात आणि महाराष्ट्र हे दोन्ही राज्य मुंबई प्रांताचे भाग होते. त्यावेळी मुंबई प्रांतात मराठी आणि गुजराती भाषकांची संख्या अधिक होती. दोन्ही भाषिकांकडून स्वतंत्र राज्याची मागणी केली जात होती. त्यामुळे भाषावार प्रांतरचनेमुळे गुजरात आणि महाराष्ट्र या दोन वेगळ्या राज्याची घोषणा करण्यात आली. 1 मे 960 रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र निर्माण झाला. त्यामुळे 1 मे रोजी महाराष्ट्र दिन साजरा केला जातो. (Why is Maharashtra Day celebrated?) विशेष म्हणजे 1 मे हा दिवस महाराष्ट्र दिन आणि कामगार दिवस म्हणून ही साजरा केला जातो. (Why is Maharashtra Day celebrated)
आंतरराष्ट्रीय कामगार दिन का साजरा केला जातो ? काय आहे इतिहास जाणून घ्या..
तत्कालीन केंद्र सरकारने `1956 च्या राज्य पुनर्गठन अधिनियमानुसार अनेक राज्यांची स्थापना करण्यात आली. भाषावर प्रांतरचना करण्यात आली. कन्नड भाषा बोलणाऱ्यांसाठी कर्नाटक राज्याची स्थापना करण्यात आली. तर तेलुगू भाषिकांसाठी आंध्रप्रदेश आणि मल्याळम बोलमआऱ्यांसाठी केरळा राज्याची स्थापना करण्यात आली. तामिळ बोलणाऱ्यांसाठी तामिळनाडूची निर्मिती झाली. पण त्यावेळी मराठी आणि गुजराती भाषा बोलणाऱ्यांसाठी वेगळं राज्य निर्माण करण्यात आलं नाही. गुजरात आणि महाराष्ट्र हा मुंबई प्रांताचाच एक भाग होता. (Why is Maharashtra Day celebrated)
मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी मराठी भाषिकांनी जोरदार आंदोलन केलं. गुजराती भाषिकांनीही वेगळ्या राज्याची मागणी लावून धरली. जाळपोळ, मोर्चे आणि आंदोलने सुरू होती. संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी 105 जणांनी आपल्या बलिदानाची आहुती दिली. फ्लोरा फाऊंटन येथे संयुक्त महाराष्ट्रासाठी प्रचंड आंदोलन करण्यात आले. त्यावेळी मुंबई राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांच्याद्वारे गोळीबार करण्याचा आदेश देण्यात आला. गोळीबार झाला आणि संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात 105 आंदोलक हुतात्मा झाले. त्यानंतर केंद्र सरकारने 1 मे 1960 रोजी मुंबई प्रांताला बॉम्बे पुनर्गठन अधिनियम 1960 नुसार महाराष्ट्र आणि गुजरात या दोन राज्यांची निर्मिती करण्यात आली. (Why is Maharashtra Day celebrated)