...

आंतरराष्ट्रीय कामगार दिन का साजरा केला जातो ? काय आहे इतिहास जाणून घ्या..

आंतरराष्ट्रीय कामगार दिन (International Labor Day) १ मे रोजी साजरा केला जातो. हा दिवस जगभरातील कामगार चळवळीच्या (labor movement) गौरवासाठी पाळला जातो. जगभरातील ८० हून अधिक देशांमध्ये हा दिवस राष्ट्रीय सुट्टीचा दिवस (National holiday) म्हणून पाळला जातो. शिकागो मध्ये ४ मे १८८६ मध्ये घडलेल्या हेमार्केट (Haymarket) घटनेच्या स्मरणार्थ जगभरातील समाजवादी, साम्यवादी आणि अराजकतावादी पक्षाने हा दिवस साजरा केला. (Why is International Labor Day celebrated? Know what is history)

 

 

 

‘मे दिन’ हा १९ व्या शतकाच्या मध्यावर कामगार चळवळीतून सुरू झाला. कामागारांना दिवसाचे आठ तास काम (Workers work for eight hours a day) ही मागणीसाठी करण्यात आला. आठ तास काम ही पहिली मागणी २१ एप्रिल १८५६ रोजी ऑस्ट्रेलियातील कामगारांकडून आली, तेव्हापासून हा दिवस तेथे सुट्टी म्हणून जाहीर झाला. (Why is International Labor Day celebrated? Know what is history)

 

 

ऑस्ट्रेलियातील (Australia) कामगारांच्या मार्गाने जात अमेरिका आणि कॅनडातील अराजाकातावादी संघटनांनी १ मे १८८६ रोजी मोर्चे आणि धरणे यांची मालिका सुरू केली. अशाच एका मोर्चाला पांगवताना ४ मे १८८६ रोजी शिकागो मध्ये सहा आंदोलनकर्त्यांचा मृत्यू झाला. याची परिणती पोलिसांच्या क्रूरतेविरोधातील एका मोठ्या निषेधात झाली त्यात एका अज्ञात व्यक्तीने पोलिसांवर बॉंब टाकला ज्यात ८ पोलिसांचा मृत्यू आणि ५० पोलीस जखमी झाले. या घटनेच्या स्मरणार्थ १ मे १८९० रोजी आंतरराष्ट्रीय आंदोलनाचे आयोजन करण्याची मागणी रेमंड लेविन याने ‘दुसऱ्या आंतरराष्ट्रीय’च्या १९८९ च्या पॅॅरीस परिषदेत केली. त्या परिषदेत १ मे १८९० हा जागतिक कामगार एकता दिवस म्हणून साजरा करण्याचे निश्चित झाले.

 

 

 

१ मे हा दिवस राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दृष्टीने महत्वाचा आहे. पहिलं कारण आपल्या सगळ्यांनाच माहित आहे. याच दिवशी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली होती. दुसरं कारण आहे या दिवसाला आंतरराष्ट्रीय कामगार दिन आणि मे दिन म्हणून जगभर मान्यता मिळाली आहे. (Why is International Labor Day celebrated? Know what is history)

 

 

१७ व्या शतकाच्या मध्यापासून सुरु झालेल्या औद्योगिक क्रांतीने युरोपमध्ये एका नव्या पर्वाला सुरुवात झाली होती, पण त्याच बरोबर नवीन समस्या पण निर्माण झाल्या होत्या. त्यातलीच एक समस्या होती कामगारांची. औद्योगिक क्रांती पासून कामगारांच्या शोषणाला, पिळवणूकीला सुरुवात झाली. त्यावेळी कामाचे तास हे तब्बल १५ तास होते. कामगारांचं जीवन हलाखीचं होतं, त्यांना त्यांच्या मेहनतीच्या मोबदल्यात योग्य तो पगार मिळत नसे. कामगारांच्या अशा परिस्थितीतून पुढे जगाचा इतिहास बदलला. (Why is International Labor Day celebrated? Know what is history)

 

Local ad 1