...

Pune Ring Road। पुणे रिंगरोडला शेतकरी  का करतायेत विरोध ? ग्रामस्थांनी अडवला महामार्ग

Pune Ring Road । पुणे जिल्ह्यातील नियोजित आराखड्याप्रमाणे रिंगरोड पूर्वीप्रमाणेच करावा, आमच्या गावात रिंगरोड नकोच म्हणत पुणे-सातारा महामार्गावर (Pune-Satara highway) शिवरे ग्रामस्थांनी गुरे, जनावर घेऊन रास्ता रोको आंदोलन केले. (Why are farmers opposing Pune Ring Road?)

 

पुणे-सातारा महामार्गावर जनावरे आणून संपूर्ण ग्रामस्थ रास्ता रोको आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यात आले. रिंगरोडमधील जमीन अधिग्रहण अधिसूचना (Land acquisition notification) त्वरित रद्द करावी तसेच शिवरे फाटा येथील उड्डाणपुलाचे काम त्वरित करावे, यासाठी येथील ग्रामस्थांनी पुणे-सातारा महामार्गावर रास्ता रोको केला. (Road stop movement on Pune-Satara highway) तब्बल २२३ एकर बागायती  क्षेत्र यामध्ये संपादित होणार आहे. त्यामुळे पुढे जगायचे कसे, असा सवालही ग्रामस्थांनी व्यक्त केला.

 

 

पूर्वी प्रस्तावित रिंगरोड (Proposed ring road) डोंगरी व जिरायती जमिनीतून जात होता. यांचे शासकीय प्रक्रिया पूर्ण झालेली असताना रिंगरोडची अदलाबदली करण्यात आली. याला शेतकऱ्यांचा विरोध असताना देखील शासन दुर्लक्ष करीत आहे. यामुळे ९५ टक्के शेतकरी शेतकरी भूमिहीन होणार आहेत, असा आरोप आंदोलक शेतकऱ्यांनी केला.

 

 

 

यावेळी भोरचे तहसीलदार सचिन पाटील, पोलीस अधीक्षक तानाजी बर्डे, रेखा वाणी, पोलीस निरीक्षक सचिन पाटील आदी उपस्थित होते. रिंग रोड बाबत तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे ग्रामस्थांनी तूर्तास आंदोलन मागे घेतले असून, न्याय न मिळाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करु असा इशाराही दिला आहे.

 

 

आंदोलनात सरपंच अमृता गायकवाड, उपसरपंच योगेश दळवी, माजी उपसरपंच माऊली डिंबळे, सूर्यकांत पायगुडे, कृष्णा डिंबळे, सोपान डिंबळे, निखिल डिंबळे, धनेश डिंबळे यांच्यासह दोन ते तीन हजार ग्रामस्थत सहभागी झाले होते.

Local ad 1