...

तत्व कोणी गुंडाळले ? उगाच ध चा म करू नको : उपमुख्यमंत्री अजित पवार (व्हिडीओ)

पुणे :  केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पक्ष बदला बाबत वक्तव्य केले आहे. त्याविषयी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारले असता, ते म्हणाले लोकशाही मध्ये कोणाला कुठंही जाण्याचा अधिकार आहे. जसे तुमच्या क्षेत्रात आहे, तसे आमच आहे. तत्व कोणी गुंडाळले? उगाच ध चा मा करू नको. देश स्वतंत्र  झाल्यापासून इतिहास पाहिला तर कळेल. वेगवेगळ्या विचाराची लोक एकत्रित आलेली आहेत. त्या – त्या वेळेसची राजकिय परीस्थिती बघून निर्णय घेतले जातात. तसे निर्णय घेतले तर त्यावर हस्तक्षेप घेतला नाही पाहिजे, असे देखील यावेळी अजित पवार म्हणाले. (Who wrapped the principle: Ajit Pawar’s question)

 

 

 

पुढील वर्षी जानेवारी महिन्यात आयोद्धेतील राम मंदिराची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. या कार्यक्रमाचे निमंत्रण देशभरातील महत्त्वाच्या तसेच राजकीय व्यक्तींना दिलं जातं आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निमंत्रण आले आहे का, असे विचारले असता, ते म्हणाले मला अजूनपर्यंत निमंत्रण आलेलेनाही. आलं तर जायचं विचार करेल.

 

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी पहाटे पहाटे भिडेवाडा तसेच महात्मा फुले वाडा येथील पाहाणी केली. यावेळी भिडे वाड्याच्या पाहणी वेळेस त्यांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराची आरती केली. यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.

यावेळी अजित पवार म्हणाले आज महापालिका आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्या समवेत महात्मा फुले वाडा आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारकाच्या बाबतीत पाहणी करण्यात आली आहे. येथील सर्वच भाग एकत्र करत जागतिक दर्जाचं स्मारक करण्यात येणार आहे.  त्यासाठी अनेक कुटुंबांना शिफ्ट करण्यात येणार आहे. मागे काही कुटुंबीयांना शिफ्ट करण्यात आलं आहे. आत्ता काही कुटुंब राहिले आहेत. पण इथ मालक वेगळे आणि भाडेकरू वेगळे आहेत. आत्ता आम्हाला मालकाला देखील खुश करावं लागणार आहे आणि भाडेकरूंना देखील पर्याय द्यावं लागणार आहे. सर्वांना विश्वासात घेऊन मार्ग काढण्यात येणार आहे.अस देखील यावेळी अजित पवार म्हणाले.

 

भिडे वाड्याची जागा कमी असून, चौदा मजले वर जावं लागेल पण ते योग्य नाही. तिकडे सगळ्या सुविधा देता आल्या पाहिजेत. पार्किंग प्रॉब्लेम आहे तो सोडवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्याठिकाणी सावित्रीबाई फुले यांच्या नावाने शाळा सुरू करताना तज्ज्ञाची मते घेऊन शाळा बांधण्यात येणार आहे,असे देखील यावेळी अजित पवार म्हणाले.

मराठा आरक्षणाच्या बाबतीत जरांगे पाटील यांनी दिलेल्या अल्टिमेट तसेच त्यांनी केलेल्या मागणीवर अजित पवार यांना विचारलं असता ते म्हणाले की आरक्षण बाबत सरकार चर्चा करत आहे. कुठल्याही बाबतीत चर्चेतून मार्ग निघत असतो. कधीही चर्चा थांबवायची नसते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दसऱ्याच्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज यांची शपथ घेतली होती आणि तश्या पद्धतीने कामाला सुरवात देखील केली. सुप्रीम कोर्टात टिकेल असा आरक्षण देण्यात येणार आहे, असे देखील अजित पवार म्हणाले.

 

सुप्रिया सुळे यांच्यासह 141 खासदारांच्या निलंबनाच्या बाबतीत अजित पवार यांना विचारलं असता ते म्हणाले की त्यांचं एकट्याच निलंबन झालेलं नाही. अनेक खासदार काम करत असताना नियम भंग झाला की ऍक्शन घेतली जाते. मला माहिती नाही तिथे काय घडले. विधानसभेत काय घडलं सागितले असते. तिथं उपराष्ट्रपती यांचं अपमान करण्यात आलं तिथं जे काही घटना घडली म्हणून कारवाई केली आहे.

 

राष्ट्रवादी बैठकबाबत अजित पवार यांना विचारलं असता ते म्हणाले की अजित पवार गट नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक झाली.आम्हीं म्हणतोय तेच खरे तुम्ही कोण ठरवणार. आम्ही कोर्टाचे बघु. तसेच आम्ही तिघे बसू पक्ष आणि निर्णय घेऊ कुठेही अडचण येणार नाही, काही अडचण येईल अस वाटत नाही. तसेच बारामती मध्ये योग्य उमेदवार दिला जाईल अस देखील यावेळी अजित पवार म्हणाले.

Local ad 1