वाल्मिक कराडला पुण्यात राहण्यास कोणी मदत केली ; शिवसेनेने केली ‘ही’ मागणी

पुणे : बीड येथील सरपंच संतोष देशमुख (Sarpanch Santosh Deshmukh) यांच्या हत्तेमध्ये मुख्य संशयित आरोपी असलेला वाल्मिक कराड हा मागील २२ दिवस महाराष्ट्र सरकारला, मुख्यमंत्री, गृहमंत्री, पोलिस प्रशासनाला (Maharashtra Government, Chief Minister, Home Minister, Police Administration) गुंगारा देत फिरत होता, त्यातील बरेच तो दिवस पुण्यात असल्याचे त्याच्या सोबत असलेल्या बिडच्या माजी नगरसेवकाने मीडिया सोबत बोलतानाच्या सांगितले आहे. याच अर्थ वाल्मिक कराड हा पुण्यातच वास्तव्यास होता. त्यामुळे पुण्यात त्याला कोणी मदत केली याची पण सखोल चौकशी व्हावी, त्यांना सहआरोपी करा, अशी मागणी शिनसेसेनेचे (युबीटी) शहरप्रमुख संजय मोरे यांनी पुणे पोलिसांकडे केली आहे. (Who helped Valmik Karad to live in Pune?)

 

१ कोटी २० लाखांचा मद्याचा साठा राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून जप्त

 

वाल्मिक कराडच्या पुणे शहरातील व इतर भागातील किती समर्थक त्याच्या संपर्कात होते व त्याला साथ देत होते, याची चौकशी करावी. तसेच पुणे शहर हे गुन्हेगारांना वास्तव्यासाठी सुरक्षित का वाटत आहे?, पुणे शहरातील गुन्हेगार इतर जिल्ह्यातील गुन्हेगारांना सहकार्य करतात, असा संशय येतो म्हणून या विषयाचा तपास होणे आवश्यक आहे, असे शहरप्रमुख संजय मोरे म्हणाले.

 

पुणे महापालिकेचा मालमत्ता कर थकबाकीदारांना मोठा झटका ; नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसांपासून नळ कनेक्शन होणार कट

 

 

वाल्मिक कराड मंगळवारी सीआयडी समोर हजर होणार हे पोलिस आणि सीआयडी व्यतिरिक्त इतर लोकांना अगोदर माहिती होते. सरकारवर उपकार केल्यासारखा आरोपी सीआयडी समोर हजर होतो. मग आरोपी अनेक दिवस बीडच्या गाड्या घेऊन समर्थकांसह पुण्यात असून, सापडत नाही, हे पटण्या सारकरे नाही. या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, यासाठी शिवसेना पुणे शहराच्या वतीने पुणे पोलिस विशेष शाखेचे उपायुक्त मिलिंद मोहिते यांना निवेदन देण्यात आले. यावेळी पुणे शहर प्रमुख संजय मोरे, उपशहर प्रमुख आबा निकम, प्रसिद्धी प्रमुख अनंत घरत, युवा सेना समन्वयक युवराज पारिख, संघटक अजय परदेशी, उपविभाग प्रमुख अनिल परदेशी, सुरेश घाडगे, संजय साळवी उपस्थित होते.

 

Local ad 1