Bigg Boss Hindi 18 मधील राजकारण, मनोरंजन ते वकिली करणारे कोण आहेत स्पर्धक

Bigg Boss Hindi 18  : ‘बिग बॉस’ हिंदी रिअ‍ॅलिटी शोच्या (‘Bigg Boss’ Hindi reality show)  18 व्या पर्वाचा ग्रँड प्रिमियर पार पडला आहे. स्पर्धक  ‘बिग बॉस’च्या घरात दाखल झाले आहेत. त्यात मनोरंजन क्षेत्रातील कलाकारांसह राजकीय आणि वकिली क्षेत्रात काम करणारे स्पर्धक सहभागी झाले आहेत. ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वाला सुरुवात होतं आहे. यंदाही होस्टिंगची धुरा सलमान खान (Hosted by Salman Khan) सांभाळणार आहे. ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वात सहभागी झालेले कलाकारांनी मनोरंजन विश्व गाजवलेलं आहे. तर काही स्पर्धक विविध मालिकांच्या माध्यमातून घराघरांत पोहोचलेले आहेत.  शोएब इब्राहिम, धीरज धूपर, नायरा बनर्जी, शिल्पा शिरोडकर, मीरा देवस्थळे, शांति प्रिया, अविनाश मिश्रा, देव चंद्रिमा सिंघा रॉय, चाहत पांडे आणि गुणरत्न सदावर्ते (Shoaib Ibrahim, Dheeraj Dhupar, Naira Banerjee, Shilpa Shirodkar, Meera Devsthale, Shanti Priya, Avinash Mishra, Dev Chandrima Singha Roy, Chahat Pandey, Gunaratna Sadavarte) हे स्पर्धक यंदाच्या पर्वात सहभागी होणार असल्याचं समोर आलं आहे. पण यापैकी कोण-कोणते स्पर्धक ‘बिग बॉस’च्या घरात जातायत हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. त्यामुळे सध्या ‘बिग बॉस १८’च्या ग्रँड प्रिमियरकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. (Who are the contestants who participated in Bigg Boss Hindi 18?)

 

हिंदी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री चाहत पांडेची ‘बिग बॉस’च्या १८व्या जबरदस्त एन्ट्री. आठ वर्ष चाहत अभिनय क्षेत्रात काम करत असून तिने अनेक मुख्य भूमिका साकारल्या आहेत. अभिनेता शेहजादा धामी आणि अविनाश मिश्राची ‘बिग बॉस १८’मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी  ९०चं दशक आपल्या बोल्ड आणि घायाळ अदांनी गाजवणारा मराठी चेहरा म्हणजे अभिनेत्री शिल्पा शिरोडकर यांची ‘बिग बॉस १८’मध्ये एन्ट्री झाली आहे. त्यांचं सलमान खानबरोबर काम करण्याचं स्वप्न होतं; जे आता ‘बिग बॉस १८’च्या माध्यमातून पूर्ण होतं आहे. शिल्पा शिरोडकर यांचं खास नातं दाक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबूशी आहे. महेश बाबूच्या त्या मेव्हूणी आहेत. शिल्पा शिरोडकर यांची सख्खी बहीण नम्रता शिरोडकर महेश बाबूची पत्नी आहे.  भारतीय जनता पार्टीचे दिल्ली यूनिटचे प्रवक्ता तेंजिदर पाल सिंह यांची ‘बिग बॉस १८’मध्ये एन्ट्री झाली आहे. तमिळ आणि मल्याळम इंडस्ट्री गाजवणारी श्रुतिका अर्जुन हिची बिग बॉस घरात एन्ट्री झाली आहे. हिंदीसह दाक्षिणात्य सिनेसृष्टीत आपल्या अभिनयासह अदांनी प्रेक्षकांची मनं जिंकणारी अभिनेत्री नायरा बनर्जीची ‘बिग बॉस १८’च्या घरात एन्ट्री झाली आहे.

 

‘खतरों के खिलाडी’च्या १४व्या पर्वाचा विजेता करण मेहराची ‘बिग बॉस’ घरात एन्ट्री झाली आहे. सोशल मीडियावर लोकप्रिय फिटनेस ट्रेनर, पॉवर लिफ्टर रजत दलाल, रजतचे इन्स्टाग्रामवर १.१ मिलियन आणि युट्यूबवर २ लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. अनुपमासह बऱ्याच हिंदी मालिकेत पाहायला मिळालेली अभिनेत्री मुस्कान बामने,  हृतिक रोशनचा खास मित्र अरफीन खान पत्नीसह ‘बिग बॉस १८’मध्ये सहभागी झाला आहे. सारा खान असे अरफीनच्या पत्नीचे नाव आहे.  इश्क का रंग सफेद’, ‘इश्क सुभान अल्लाह’ आणि ‘सिर्फ तुम’सारख्या मालिकांमधून प्रेक्षकांची मनं जिंकणारी ईशा सिंह. अभिनेत्री ईशा सिंहनंतर ॲड. गुणरत्न सदावर्तेंची ‘बिग बॉस १८’च्या पर्वात एन्ट्री झाली आहे.

‘व्हायरल भाभी’ म्हणून लोकप्रिय असलेल्या हेमा शर्मा, हिंदी मालिकाविश्वातील लोकप्रिय चेहरा विवियन डिसेनाने प्रवेश केला आहे. याआधी तो सातत्याने ‘बिग बॉस’ ऑफर नाकारत होता. २७ वर्षी अभिनेत्री एलिस कौशिक दिल्लीची राहणारी आहे. पंड्या स्टोर नावाच्या लोकप्रिय मालिकेतील एलिश झळकली होती.  सलमान खानच्या बहुचर्चित शोमध्ये गाढवाची एन्ट्री झाली आहे. हे पाळवी गाढव असून ते गुणरत्न सदावर्तेंचे आहे.

 

Local ad 1