रेडी रेकनरमध्ये पुण्यातील कोणता परिसर ठरला सर्वात महागडा ? ; कोरेगाव पार्कला या रस्त्याने टाकले मागे ?
जमीन आणि सदनविकांच्या किंमतीमध्ये कोरेगाव पार्क ला (Koregaon Park) मागे टाकत लाॅ काॅलेज रस्त्यावरील (Law College Road) मालमत्ता महाग झाल्या आहेत. पुण्यामध्ये लॉ कॉलेज रस्ता हा परिसर सर्वाधिक महागडा ठरला
पुणे : मुद्रांक शुल्क तथा रेडी रेकनरमध्ये (Ready reckoner) सरासरी ४.१६ टक्के वाढ झाल्यानंतर नवे दर लागू झाले आहेत. गेली काही वर्षे कोरेगाव पार्क हे सर्वात महागडे परिसर म्हणून ओळखले जात होते. मात्र, गेल्या वर्षभरात झालेल्या खऱेदी विक्रीचा अभ्यास करुन राज्याच्या नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने पुणे शहरातील सर्वात महागडा परिसर निश्चित केला असून, विभागनिहाय दर जाहीर केले आहेत. जमीन आणि सदनविकांच्या किंमतीमध्ये कोरेगाव पार्क ला (Koregaon Park) मागे टाकत लाॅ काॅलेज रस्त्यावरील (Law College Road) मालमत्ता महाग झाल्या आहेत. पुण्यामध्ये लॉ कॉलेज रस्ता हा परिसर सर्वाधिक महागडा ठरला असून, या परिसरात सदनिकेचा दर प्रतिचौरस मीटर एक लाख ८० हजार ९५० रुपये इतका आहे, तर ऑफिससाठीचा दर दोन लाख आठ हजार १०० रुपये प्रतिचौरस मीटर इतका आहे. (Which area of Pune has the most expensive property?)
पुण्यात नेहमीच महागाईमध्ये अग्रेसर असलेल्या कोरेगाव पार्क परिसराला लॉ कॉलेज रोडने मागे टाकले आहे. कोरेगाव पार्क परिसरात सदनिकांचा दर एक लाख ७९ हजार ४९० रुपये प्रतिबौरस मीटर, तर आऑफिससाठीचा दर हा दोन लाख सहा हजार ४२० रुपये प्रतिचौरस मीटर इतका आहे. शहरातील जमीन, सदनिका, ऑफिस आणि दुकानांचे दर देण्यात आले आहेत. त्यातील आकडेवारीनुसार शहरातील ‘टॉप-टेन’ भागांतील दर नोंदणी विभागाने जाहीर केले आहेत.
जंगली महाराज रस्ता या परिसरात दुकानांचा दर चार लाख ७५ हवार ९४० रुपये प्रतिचौरस मीटर आहे. तर, शहरात जमिनीचा सर्वाधिक कमी दर हा नांदोशी गावात असून, या ठिकाणी दोन हजार १७० रुपये प्रतिचौरस मीटर इतका आहे. त्याखोलाखाल किरकटवाडी येथे दोन हजार ६८० रुपये प्रतिचौरस मीटर इतका आहे.
महागड्या मालमत्तांचा रेडी रेकनर दर (प्रतिचौरस मीटरमध्ये)
भागाचे नाव – जमिनीचा दर – (चौरस मीटर) – सदनिका – आॅफिस
प्रभात रोड – भांडारकर रोड, लॉ कॉलेज रोड – 86,710 – 1,65,220 – 1,90,010
गरवारे कॉलेज ते एसएनडीटी कॉलेज रोड – 81,520 – 1,51, 870, – 1,74,660
ज्ञानेश्वर पादुका चौक ते गणेशखिंड रस्ता – 77,950 – 1,35,770 – 1,56,140
गोखले चौक ते बाजीराव रोड -लक्ष्मी रोड 77,220 – 1,14,720 – 1,85,440
लॉ कॉलेज, टीपी स्कीम नंबर १ – 77,000 – 1,30,160 – 1,52,220
भांडारकर रोड, टीपी स्कीम नंबर १ – 76,630 – 1,40,490 – 1,61,750
के. पालकर रोड, प्रभात रोड गल्ली क्रमांक ७ – 75,170 – 1,55,670 – 1,79,030
लकडी पूल ते गोखले चौक – लक्ष्मी रोड – 73,250 – 1,24,170 – 1,62,940
घोले रोड, टीपी स्कीम १ – 73,010 – 1,22,660 – 1,44,080
आपटे रोड, टीपी स्कीम नंबर १ – 72,980 – 1,17,030 – 1,45,790