कार्यकर्ता जपायला स्व. विलासराव देशमुख यांनी शिकवलं : हर्षवर्धन पाटील

पुणे : ‘कार्यकर्ता सांभाळला तर नेतेपण कायम टिकून राहते, अशी आम्हांला स्व.विलासराव देशमुख  (Late Vilasrao Deshmukh) यांनी शिकवण दिली. कार्यकर्ता कसा घडतो हे त्यांच्या काळात शिकायला मिळाले,’ असे प्रतिपादन भाजपचे नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील  (Former Minister Harshvardhan Patil) यांनी केले. (Only when the worker is saved, the leadership survives) 

 

 

omicron | पुण्यातही ओमायक्रॉनचा शिरकाव ; पिंपरीत 6, पुण्यात 1 रुग्ण आढळला

जिल्हा परिषदेचे माजी सभापती रामभाऊ बराटे यांच्या मित्र परिवाराच्या निमित्ताने रामभाऊ बराटे (Rambhau Barate) आदर्श कार्यकर्ता पुरस्कार शरद बुट्टे पाटील (Sharad Butte Patil) यांना प्रदान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर अध्यक्षस्थानी माजी खासदार अशोक मोहोळ (Former MP Ashok Mohol), माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर (Former Minister Balasaheb Shivarkar), बुट्टे पाटील, सचिन बराटे, संयोजक जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे, मुरलीधर निंबाळकर आदी उपस्थित होते.  (Only when the worker is saved, the leadership survives)

 

 

 

पूर्वीसारखा कार्यकर्ता आणि राजकारण राहिले नाही. सार्वजनिक कामांऐवजी व्यक्तिगत अडीअडचणी सोडविण्यासाठी येणारा, सुख दुःखात, लग्नापासून विविध घरगुती कार्यक्रमांच्या ‘इव्हेंट मॅनेजमेंट’मध्ये (Event management) असेल तो लोकप्रिय नेता अशी सध्या नेत्याची व्याख्या झाली आहे, अशा शब्दांत सध्या राजकीय स्थितीवर भाष्य केले. परंतु कार्यकर्ता जपला पाहिजे, तरच आपले नेतेपद टिकून रहाते, असे हर्षवर्धन पाटील म्हणाले.   (Only when the worker is saved, the leadership survives)

 

 

‘कार्यकर्ता, नेत्यामध्ये समन्वय राहिला पाहिजे. पण आता तशी परिस्थिती नाही. कोणीही कोणाकडे जाऊन कामे करून घेत आहे. त्या कामाचे स्वरूपही अनेकांना माहिती नसते. पूर्वी कार्यकर्त्याला किंमत होती. आता तसे राजकारण राहिले नाही. आता सार्वजनिक ऐवजी व्यक्तीगत फायद्यासाठी सर्व काही सुरू आहे,’ अशी खंत पाटील यांनी व्यक्त केली. आदर्श कार्यकर्ता पुरस्कारासाठी अभ्यासू कार्यकर्ता म्हणून  जिल्हा परिषदेचे सदस्य शरद बुट्टे पाटील यांची सार्थ निवड करण्यात आली आहे, असेही गौरवोदगार पाटील यांनी काढले.   (Only when the worker is saved, the leadership survives)

 

माजी खासदार अशोक मोहोळ म्हणाले, निष्ठेने काम करणारे कार्यकर्ते मिळत नाही. निष्ठाच आता राहिली नाही. नेते आता स्वतःचे पाहतात. सर्वांसाठी काम करण्याची ताकद असूनही काम करण्याची इच्छा नसते. सध्याच्या राजकारणावर न बोलले बरे. पक्षप्रेम आणि नीतिमत्ता यांचा र्‍हास होत आहे, अशा शब्दांत त्यांनी राजकीय स्थितीवर टिपण्णी केली.

 

‘कार्यकर्त्यांना कर्तृत्व सिद्ध करण्याची ताकद दिली पाहिजे. त्यामुळे पंचायतराजचे आकर्षण वाढेल. आपण जिल्हा परिषदेच्या सभागृहात मतदारसंघाऐवजी सामूहिक विषयाबाबत आग्रही, आक्रमक भूमिका मांडतो.  चांगल्या कामाची नोंद राजकीय पक्षांच्या पलीकडे ठेवली जाते. कामाच्या आधारावर लोकांच्या मनात कार्यकर्ता जिवंत राहतो. फ्लेक्सबाजी करून कोणी जिवंत राहत नाही, असे पुरस्काराला उत्तर देताना बुट्टे पाटील म्हणाले.  (Only when the worker is saved, the leadership survives)

 

Local ad 1