पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आदित्य ठाकरेंची नजरा-नजर होते तेंव्हा..
मुंबई : मुंबई येथे लता मंगेशकर यांच्या अंत्यसंस्कारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आले होते. तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आगमनावेळी विमानताळावर स्वागतासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यासह राज्याचे राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे उपस्थित होते. त्यावेळचे फोटो समोर आले असून, त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आदित्य ठाकरे यांची थेट नजरा-नजर आणि त्यातून झालेली चर्चा दिसून येत आहे. (When Prime Minister Narendra Modi and Aditya Thackeray were eye-to-eye…)
मुंबई विमानतळावर नरेंद्र मोदी यांचे हात जोडून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी स्वागत केले. त्यानंतर राज्यपालांच्या शेजारी उभे असलेल्या राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांनीही मोदींचे स्वागत केले आहे. त्यावेळी मोदींनीही हात जोडत नम्रतापूर्वक त्यांना प्रतिसाद दिला. यानंतर मोदींनी आदित्य ठाकरेंसोबत काही चर्चा केली. त्यांना काही विचारणा केली. तेव्हा मोदींच्या डोळ्यात डोळे घालून आदित्य ठाकरे संवाद साधताना दिसत आहेत. फोटोत मोदींचा प्रश्न आदित्य ठाकरे अत्यंत बारकाईने ऐकताना दिसून येत आहेत. मागच्या बाजूला राज्यपाल भगतसिंह कोश्यारीही दिसत आहेत. (When Prime Minister Narendra Modi and Aditya Thackeray were eye-to-eye…)
Prime Minister Narendra Modi reaches Mumbai to attend the funeral ceremony of Bharat Ratna Lata Mangeshkar
(Pics source: Maharashtra Governor Office) pic.twitter.com/QelLRB8Dx1
— ANI (@ANI) February 6, 2022