व्हाट्सअपची सेवा दोन तास बंद झाली अन् युजर्स झाले अस्वस्थ !

मुंबई : दुपारी बारा वाजता अचानक बंद झाला, मॅसेज (Message) येणे आणि जाणे बंद झाले. कोणालाही काहीच कळत नव्हते. नेमक काय झाल. एकमेकांना तुमचा व्हाट्सअप (WhatsApp) सुरु आहे का? अशी विचारणा करत होते. काही क्षणातच व्हाट्सअप बंद झाल्याचे माहिती वार्‍यासराखी पसरली, तेही व्हाट्सअप विनाच. अवघे दोन तास व्हाट्सअप बंद (WhatsApp off) झाल्याने युजर्स अस्वस्थ झाल्याचे दिसून येत होते. (WhatsApp service was stopped for two hours and the user was upset!)

 

व्हाट्सअपचे सर्व्हर क्रेश (Whatsapp server crash) झाल्यामुळे लोकांना एकमेकांना मेसेज पाठवता येत नव्हते. त्यामुळे लक्षावधी यूजर्स हैराण झाले होते. अखेर ही सेवा पुन्हा सुरू झाल्याने भारतातील यूजर्सनी सुटकेचा निःश्वास टाकला. (WhatsApp service was stopped for two hours and the user was upset!)

मंगळवारी दुपारी 12 वाजून 7 मिनिटांनी व्हाट्सएपच्या ग्रुपवर मेसेज पाठवण्यात काही यूजर्सना अडचणी यायला सुरूवात झाली होती. त्यानंतर काही वेळाने पर्सनल मेसेज ही पाठवता येत नव्हते. त्यामुळे व्हाट्सअप बंद पडले की काय? अरशी विचारणा अनेक यूजर्स फेसबुक आणि ट्विटरवर करत होते. काही जणांनी या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर गंमतीशीर मीम्सही शेअर केले होते.

तांत्रिक बिघाड झाल्यामुळे व्हाट्सअप ची सेवा विस्कळीत झाल्याचे सांगितले जात असताना च हा बिघाड झाल्याच्या सुमारे दीड तासांनतर व्हॉट्सअपची मालक असलेल्या मेटा कंपनीने स्पष्ट केले.  (WhatsApp service was stopped for two hours and the user was upset!)

सुमारे दोन तास व्हॉट्सअप डाऊन राहिल्यानंतर मेटा कंपनीने ही सेवा पूर्ववत केली आहे. आता मोबाइलबरोबरच संगणक आणि लॅपटॉपवर ही व्हॉट्सअप वेबही (WhatsApp web on mobile as well as computer and laptop)  कनेक्ट होऊ लागले आहे. आज दुपारपासून व्हॉट्सअपवरून मेसेजची देवाणघेवाण करता येत नसल्यामुळे भारतातील लाखो युजर्स हैराण झाले होते. अनेकांचे कोणतेही मेसेज जात किंवा येत नव्हते. व्हॉट्सअपच्या यात बिघाडाचा सर्वाधिक फटका मुंबई, दिल्ली, कोलकाता (Mumbai, Delhi, Kolkata) पुन्हा पूरववत करण्याचा आम्ही प्रयतन करत आहोत, असे कंपनीच्या प्रवक्त्याने म्हटले होते.

Local ad 1