...

(What to do?) ठाकरे सरकार आमच्या सारख्या गरीब मुलांनी करायचं काय?

मुंबई : एका तरुणाने  सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये तो तरुण म्हणतोय, परळ स्टेशन वर तिकीट नसल्यामुळे टीसीने मला पकडलं आहे. दीड वर्ष मी घरी होतो. नुकतीच मला नोकरी लागली आहे. आज माझ्या कामाचा दुसरा दिवस आहे. हे अधिकारी त्यांचं काम करत आहेत. मात्र, या झोपलेल्या सरकारला कधी जाग येणार आहे.  सामान्य माणूस रोज कमवणार तर रोज खाणार. असे रोज फाईन भरणार तर आम्ही खाणार काय? असा भेदक प्रश्न या तरुणाने केला आहे. What does the Thackeray government want poor children like us to do?

कोरोनाने सर्वांचेच कंबरडे मोडले आहे. त्यातच तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्यात आणखी कडक निर्बंध लागू करण्‍यास सुरूवात झाली आहे.एकिकडे वाढती महागाई, सुटलेला रोजगार व कोरोना निर्बंध यामुळे सामान्य जनतेचे प्रचंड हाल होऊ लागले आहेत. यावर भाष्य करणारा एक व्हिडिओ सध्या सोशल मिडीयावर जोरदार वायरल झाला आहे. What does the Thackeray government want poor children like us to do?

आम्हाला तिकीट दिली जात नाही, कारण की आम्ही सरकारी अधिकारी नाहीत. आम्ही सरकारी अधिकारी नाही म्हणून आम्ही गुन्हेगार आहोत का? माझ्या बँक खात्यात आज फक्त 400 रुपये आहेत. लॉकडाउनमुळे नोकरी गेली, दीड वर्ष घरी असल्यामुळे माझी ही अवस्था झाली आहे. दीड वर्ष घरी असलो तरी आमच्या मनात आत्महत्येचे विचार येत नाही. असेच चालू राहिले तर आमच्या सारख्या गरीब मुलांनी करायचं काय? असा प्रश्न या तरुणाने केला आहे.

दरम्यान वायरल व्हिडिओमध्ये बोलत असलेल्या या तरूणाने अवघ्या महाराष्ट्राची एकुणच अवस्थेची प्रातिनिधिक स्वरूपात मांडणी केली आहे. त्याने या व्हिडीओच्या माध्यमांतून जनतेच्या मनातली खदखद ऐरणीवर आणली आहे. आज या तरुणाची जी काही अवस्था आहे तशीच अवस्था राज्यातील लाखो तरुणांची आहे. सरकारने राज्यातील सर्वसामान्य जनतेला दिलासा देण्यासाठी तातडीने उपाययोजना हाती घेण्याची आवश्यकता आहे. अन्यथा जनतेच्या संतापाचा उद्रेक कोणत्याही क्षणी होऊ शकतो हे मात्र निश्चित!   What does the Thackeray government want poor children like us to do?

हाच धागा पकडून मनसेने आघाडी सरकारवर तोफ डागली आहे. तुमची घरे वसुलीने चालतात पण सामान्य जनतेला नोकरी उद्योग धंदे करून आपली घरे चालवावी लागतात. महावसुली सरकार सामान्य जनतेचा कधी विचार करणार? हे सरकार महावसुली सरकार आहे. अशी घणाघाती टीका मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विटद्वारे केली आहे.(What to do?)

Local ad 1