(New mutation) कोरोनाचा नवीन म्युटेशन म्हणजे काय ? चला तर जाणून घेऊया !
मुबंई : कोरोना आल्यापासून त्याने आपले रंग बदलले. तो नव्या रुपात येतो म्हणजे नेमकं काय ? हे सगळं सोप्या भाषेत राज्याच्या कोविड टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. संजय ओक यांनी समजून सांगितलं आहे. What is the new mutation of the corona? Let’s find out!
कोरोनावर जे काटे (स्पाईक प्रोटीन) असतात त्याचा एक जरी काटा बदलला तरी कोरोनाचा एक नवा उपप्रकार तयार होतो. त्यापैकी अल्फा, बीटा हे उपप्रकार आहेत. असाच एक कोरोनाचा नवीन उपप्रकार डेल्टा प्लस च्या रूपाने पुढे आला आहे. त्याची संसर्गक्षमता जास्त आहे, त्यापासून बचाव करण्यासाठी आपण लस आणि मास्क वापराने बंधनकारक आहे.
शिवसेचे खासदार राहुल शेवाळे यांनी इन्फो डेस्क च्या माध्यमातून आयोजित केलेल्या फेसबुक पेजवरील कोरोना आणि तिसरी लाट याविषयी कार्यक्रमात डॉ. ओक बोलत होते. यावेळी ते म्हणाले, जेव्हा कोरोनाचा एखादा उपप्रकार समोर येतो, तेव्हा त्याचा संसर्ग आणि त्याची आजारी करण्याची तीव्रता (विरुलन्स) कशी आहे, यावर तो विषाणू किती घातक आहे हे समजते. डेल्टा या प्रकाराची संसर्गक्षमता जास्त आहे. दुसरी लाट ओसारण्याआधी तिसरी लाट सुरू होतेय का असा प्रश्न पडला आहे. एका बाजूला व्हायरस अंग बदलतोय आणि दुसरीकडे लोक लस घेताना दिसून येत नाहीत, अशी चिंता त्यांनी व्यक्त केली.
कोरोनाच्या पहिल्या लाटेत कुटुंबातील 6 पैकी एकच जण बाधित व्हायचा मात्र दुसऱ्या लाटेत आपण कुटुंबातील सर्व बाधित होताना पाहिले. कारण, डेल्टाची संसर्गजन्य क्षमता वाढलेली आहे. संसर्ग आणि त्याची तीव्रता देखील वाढला आहे. कुटुंबातील किती रुग्ण ऍडमिट होते, किती जणांना ऑक्सिजन द्यावा लागला, किती मृत्यू झाले यावर त्याचे मोजमाप केले जाते. संसर्गक्षमता आणि विरुलन्स आपल्या हातात नाही पण लसीकरण आणि मास्क हे पर्याय आपल्या हातात आहेत. त्यामुळे त्याचा वापर हेच आपलं कवच आहे.
मुलांमध्ये लस सुरक्षित