...

पंतप्रधान आणि राष्ट्रपती यांच्या हस्ते होणाऱ्या ध्वजारोहणात नेमका काय फरक असतो ? जाणुन घ्या

दिल्ली : स्वातंत्रय दिवसानिमित्त (Independence day) 15 ऑगस्टला मुख्यकार्यक्रमात पंतप्रधान सहभागी होऊन ध्वजारोहन करतात. तर प्रजासत्ताक दिन (Republic day) 26 जानेवारी रोजीच्या मुख्यकार्यक्रमात राष्ट्रपती सहभागी होऊन ध्वज फडकवतात. (What is the difference between flag hoisting by the Prime Minister and the President?)

 

स्वातंत्र्य दिनाच्या (Independence day) मुख्यकार्यक्रम लाल किल्ल्यावर आयोजित केला जातो. त्यावेळी ध्वजारोहणानंतर पंतप्रधान देशाला संबोधित करतात. तर 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनी (Republic day) मुख्य कार्यक्रम हा राजपथ येथे आयोजित केला जातो. याठिकाणी राष्ट्रपती यांच्या हस्ते प्रमुख ध्वज फडकवला जातो.  पंतप्रधान हे देशाचे राजकीय आणि राष्ट्रपती संविधानिक प्रमुख आहेत. भारतीय संविधान हे 26 जानेवारी रोजी लागू करण्यात आला होता.

प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्य दिनी ध्वज फडकवण्यात काय फरक आहे ?

स्वातंत्र्य दिनाला (Independence day) झेंडा खालून दोरीने खेचून वर खेचून मग उघडून फडकवला जातो. त्याला ध्वजारोहण असे म्हणतात. कारण 15 ऑगस्ट 1947 च्या ऐतिहासिक घटनेला सन्मान देण्याच्या हेतूने केले जाते. इंग्रजीत याला Flag Hoisting असे म्हणतात. तर 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी (Republic day) झेंडा वरच बांधलेला असतो आणि त्याला उघडून फडकवले जाते. त्याला संविधानात Flag Unfurling (झेंडा फडकवणे) असे संबोधले जाते.  (What is the difference between flag hoisting by the Prime Minister and the President?)

 

राष्ट्रीय युवा पुरस्काराने महाराष्ट्रातील “हे” चार युवक सन्मानित

प्रजासत्ताक दिनाच्या समारंभात प्रमुख पाहुणे निमंत्रित असतात

स्वातंत्र्य दिनाला लाल किल्ल्यावर ध्वजारोहण केले जाते.तर प्रजासत्ताक दिनी राजपथावर झेंडा फडकावला जातो. संपूर्ण भारतात प्रजासत्ताक दिन सांस्कृतिक कार्यक्रम आणि इतर आयोजनासह साजरा केला जातो. तर स्वातंत्र्य दिन साध्या पद्धतीने साजरा केला जातो. प्रजासत्ताक दिवशी देश आपली सैन्य ताकद आणि सांस्कृतिक विलक्षणता दर्शवतो. जेव्हाकी स्वातंत्र्य दिन असे काही आयोजन नसतात. 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनी समारंभात प्रमुख अतिथींना आमंत्रण दिले जाते. (What is the difference between flag hoisting by the Prime Minister and the President?)

 

धक्कादायक : बालशौर्य पुरस्कार प्राप्त करतोय मोलमजुरी

 

Local ad 1