काय घडल्या राजकीय घडामोडी ? (What happened to the political developments?)

  • एकनाथ शिंदे यांनी बंड करत रात्रीच सुरत गाठले
  • बंडखोरांची समजूत काढण्यासाठी मिलिंद नार्वेकर आणि रविंद्र फाटक यांनी सुरत गाठले. परंतु शिष्टाई निष्फळ ठरली. (What happened to the political developments?)
  • शिवसेना आमदारांनी कोणतही बंड केलेलं नाही, एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
  • गुवाहाटीला रवाना होण्यासाठी शिंदेंसह समर्थक आमदार सुरत विमानतळावर दाखल
  • शिदेंसोबत शिवसेनेचे ३३ तर इतर दोन आमदार
  • एकनाथ शिंदेंसह सर्व आमदार गुवाहाटी विमानतळावर दाखल
  • विमानतळावरुन सर्व आमदार गुवाहाटीच्या ब्ल्यू रेडिसन हॉटेलमध्ये वास्तव्य
  • शिवसेना समर्थक राज्यमंत्री बच्चू कडू गुवाहाटीत
  • गुवाहाटीमध्ये पोहचताच एकनाथ शिंदे पुन्हा कॅमेऱ्यासमोर, आपल्याबरोबर 40 आमदार असल्याचा दावा करून शिंदेंचे शिवसेनेला आव्हान
  • एकनाथ शिंदेंना जवळपास अपक्षांसह 50 आमदारांचा पाठिंबा असल्याचे बच्चू कडूंचे वक्तव्य,
  • महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली.
  • ठाण्यातले 5 आजी माजी नगरसेवक एकनाथ शिंदे यांच्या सोबत  ठाण्यात आणखीन काही नगरसेवक स्टँड बाय मोड वर असल्याचीही माहिती
  • देवेंद्र फडणवीसांच्या सागर बंगल्यावर भाजप नेत्यांची खलबते.
  •  शरद पवार सिल्व्हर ओकवरील बैठक आटोपून वाय. बी. चव्हाण सेंटरला रवाना
  • महाराष्ट्रातील राजकीय पेचावर खासदार संजय राऊतांचे ट्विट, ‘राजकीय घडामोडींचा प्रवास विधानसभा, बरखास्तीच्या दिशेने’, असे म्हणत उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्याचे एकप्रकारे राऊतांकडून संकेत, दुसरीकडे राष्ट्रवादीचे आमदार अजित पवार यांच्या कार्यालयात कामकाजात व्यस्त
  • मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोरोना पॉझिटिव्ह. मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री ऑनलाईन उपस्थिती.
  • दरम्यान शिंदेंच्या बंडानंतर शिवसेना आमदार दीपक केसरकरांचे मोठे वक्तव्य, शिवसेना आणि भाजपने एकत्र राहायला हवे अशी मागणी केसरकर यांनी केली.
  • देवेंद्र फडणवीसांच्या सागर बंगल्यावर  नारायण राणे दाखल
  • शिवसेनेच्या विधिमंडळ मुख्य प्रतोदपदी भरत गोगावले शिदेंकडून सुनील प्रभूंची प्रतोद पदावरुन उचलबांगडी
  • राज्यात राजकीय घडामोडींना वेग अपक्ष आमदार गीता जैन आणि बविआचे क्षितीज ठाकूर फडणवीसांच्या भेटीला तर राष्ट्रवादीच्या आमदारांना मुंबईत पोहोचण्याचे आदेश
  • मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा जनतेशी संवाद, मी मुख्यमंत्रीपद सोडायला तयार आहे. “मी राजीनामा तयार करुन ठेवलाय, मी मुख्यमंत्री नको हे समोर येऊन सांगा” उद्धव ठाकरेंचे एकनाथ शिंदेंना समोर येण्याचे आव्हान
  • गुवाहाटीला गेलेले बाळापूरचे  शिवसेना आमदार नितीन देशमुख महाराष्ट्रात परतले. त्यांनी माध्यमांसमोर येत आपल्याला मारहाण झाल्याचे आणि जबरदस्ती नेल्याचे सांगत हे सगळं भाजपचं षडयंत्र असल्याचा दावा केला.
  • एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीची तयारी मागील 6 महिन्यांपासून, गृहखात्याकडून मुख्यमंत्र्यांना माहिती दिल्यानंतरही दुर्लक्ष
  • शिवसेनेचे आणखी सहा आमदार नॉट रिचेबल असल्याची माहिती समोर आली, मातोश्रीवर बैठकांचं सत्र सुरु
  •  कोणाला ठेवायचं, कोणाला काढायचं, हे तुम्ही ठरवा, सुरुवात सुनील प्रभूंपासून करा, सरनाईक-गोगावले यांच्यातील संभाषण व्हायरल
  • राज्यातील सत्ता पेच आणखी गडद, प्रियंका गांधी मुंबईत; विमानतळावरच काँग्रेस नेत्यांशी खलबतं
  • गुवाहाटीमध्ये शिवसेना आमदार असलेल्या हॉटेलबाहेर तृणमूल काँग्रेसचे जोरदार आंदोलन
  • आमदारांना डांबून ठेवण्यामागेही भाजपचाच हात असल्याचंही संजय राऊत  राऊतांनी सांगितलं. शिवसेनेचे 17 ते 18 आमदार भाजपच्या ताब्यात असल्याचा नवा दावा
  • ‘ही आहे आमदारांची भावना’; एकनाथ शिंदेंचं नव्या पत्रासह नवं ट्वीट केलं. हे पत्र आमदार संजय शिरसाट यांनी लिहिलेलं ज्यात बडव्यांचा उल्लेख करत मुख्यमंत्री भेटत नसल्याची तक्रार होती
  • पक्षप्रमुखानं गटनेता नेमायचा असतो, मुख्यमंत्र्यांनी अजय चौधरींची नेमणूक केलीय, ते पत्र मी स्वीकारलंय असं विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी सांगितले.
  • एक दिवस आधी एकनाथ शिंदेंविरुद्ध आंदोलन करणारे सदा सरवणकर यांच्यासह काही आमदार शिंदे गटात गेले, यानंतर सदा सरवणकर गद्दार म्हणत शिवसैनिक आक्रमक, मुंबईत बॅनरला काळं फासलं
  • गुवाहाटीमध्ये एकनाथ शिंदेचे शक्तिप्रदर्शन; नवा व्हिडिओ समोर आला
  • कृषीमंत्री दादा भुसेही एकनाथ शिंदे गटात जाऊन पोहोचले.
  • शिवसेनेने महाविकास आघाडीतून बाहेर पडावे अशी आमदारांची इच्छा असेल तर आमदारांनी 24 तासांत मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोर उपस्थित राहून चर्चा करावी असे आवाहन शिवसेना नेते संजय राऊत यांनी केले.
  • शिंदे यांच्याकडूनच त्यांच्यासोबत असलेल्या यादीची घोषणा केली. शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे 37 आमदार असल्याचा दावा केला तर 9 अपक्ष आमदार सोबत असल्याचा देखील दावा केला.
  • पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, “आमच्या हातात काहीच नाही, उद्धव ठाकरे यू टर्न घेतील वाटत नाही”
  • सुटका करून पळून आल्याचा नितीन देशमुखांचा दावा खोटा; शिंदे गटाकडून फोटो जारी करत दिला पुरावा
  • नाना पटोले म्हणाले…अजित पवार शिवसेनेप्रमाणे काँग्रेसच्या आमदारांनाही त्रास द्यायचे, निधी देत नसत
  • एवढे मंत्री रातोरात निघून गेल्याचं कसं कळलं नाही?, शरद पवार गृहखात्यावर नाराज.
  • का उगाच वण वण भटकताय? घरचे दरवाजे उघडे आहेत, संजय राऊतांचं बंडवीरांना चर्चेचं आमंत्रण
  • आसाममधील शिवसेनेच्या आमदारांना बंगालला पाठवा, त्यांचा योग्य पाहुणचार करू; ममता बॅनर्जी यांचा भाजपला टोला.
  • बंडखोरी करणाऱ्यांना किंमत मोजावी लागेल; शरद पवारांचा इशारा तर सरकार टिकवण्यासाठी उद्धव ठाकरेंना राष्ट्रवादीचा पाठींबा असल्याचं अजित पवार यांनी सांगितलं पण अजित पवारांकडून भाजपला क्लीन चिट!

 

  • भाजपचा पाठिंबा असल्याचं एकनाथ शिंदेंनी केलं मान्य, तर शिंदेंच्या मागे भाजपच, अजित पवारांना त्याची माहिती नाही, बंडखोरांना इकडे यावंच लागेल असं शरद पवार म्हणाले.
  •  एकनाथ शिंदेंच्या मनधरणीसाठी नार्वेकरांसोबत सूरतला गेलेले फाटकही शिंदेंच्या गटात, गुवाहाटीत दाखल
  • बंडखोरांच्या केसालाही धक्का लागल्यास घर गाठणे कठिण होईल; नारायण राणेंची थेट शरद पवारांना धमकी.
  • 12 आमदारांचं सदस्यत्व रद्द करा, शिवसेनेची विधानसभा उपाध्यक्षांकडे मागणी केली तर आम्ही तुमच्या धमक्यांना भीक घालत नाही, खरी शिवसेना आमचीच; कारवाईसंबंधी शिवसेनेच्या पत्रानंतर एकनाथ शिंदेंचा इशारा
  • जे गेलेत त्यांचा विचार करु नका, मेळावे लावा, शाखा पिंजून काढा; उद्धव ठाकरे यांचे विभागप्रमुखांना आदेश

 

  • एकनाथ शिंदेंकडून कोणताही प्रस्ताव नाही, राज्यातील घडामोडींशी भाजपचा संबंध नाही, असा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले.
  • अजय चौधरी, सुनील प्रभूंच्या नियुक्तीविरोधात एकनाथ शिंदे हायकोर्टात जाणार असल्याचे सांगितले. शिवसेनेकडून शिंदे गटातील आणखी चार आमदारांच्या अपात्रतेची मागणी; एकूण 16 आमदारांचा समावेश

 

 

  • नरहरी झिरवाळ यांच्याविरोधात दोन दिवसांपूर्वीच अविश्वास प्रस्ताव, आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय घेण्याचा अधिकार नसल्याचा दावा ; अपक्ष आमदारांचे पत्र
  • शिवसैनिक होऊ शकतात आक्रमक, राज्यातील सर्व पोलीस ठाण्यांना हाय अलर्ट राहण्याचे पोलिसांचे आदेश. (What happened to the political developments?)
  • शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात मातोश्रीवर बैठक, दोन तासांनी संपली बैठक.
  • बंड करण्यासाठी मुख्यमंत्री आजारी असतानाची वेळ निवडली, आता आपण लढायचे आणि जिंकायचे, आदित्य ठाकरेंचे कार्यकर्त्यांना आवाहन.
Local ad 1