गोरगरिबांची रोजीरोटी दंगलीच्या नावाखाली कोणी हिरावण्याचा प्रयत्न करीत असेल, तर त्यांच्या विरुद्ध कठोर पावले उचलू : जिल्हाधिकारी डॉ. इटनकर

नांदेड : नुकत्याच झालेल्या अनूचित घटना व कायदा हातात घेऊन जो विध्वंस करण्याचा प्रयत्न काही समाजकंटकांनी केला त्यामुळे नांदेडच्या शांतता व सुव्यवस्थेला धक्का पोहोचला. कोविड-19 च्या अतिशय आव्हानात्मक काळात भाईचारा, संहिष्णुता, मानवता जपून नांदेड जिल्ह्याने जे एकात्मतेचे प्रतिक जगापुढे ठेवले त्या एकात्मतेला तुरळक घटनांनी आव्हान निर्माण होणार नाही. नांदेड जिल्ह्यातील नागरीक हे शांतताप्रिय (The citizens of Nanded district are peace loving) असून नुकतीच सुरू झालेली गोरगरबाची रोजीरोटी दंगलीच्या नावाखाली कोणी हिरावण्याचा प्रयत्न करीत असेल तर त्यांच्या विरुद्ध आम्ही कठोर पावले उचलू असा इशारा जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिला. (What did Dr. Vipin Itankar say about violence?)

 

 

दि. 12 नोव्हेंबर रोजी नांदेड येथे काही ठराविक लोकांनी अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यातील 40 गुन्हेगारांना ओळखून अटक केली आहे. उर्वरीत लोकांची शोध मोहिम युद्ध पातळीवर सुरू असून 4 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कोणत्याही परिस्थितीत समाजकंटकांना कठोर शासन करून नांदेड येथील शांतता व सुव्यवस्थता जपण्यावर जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासन अधिक दक्ष असल्याचेही त्यांनी सांगितले.

 

नांदेड जिल्ह्यात जमावबंदी लागू

 

मोर्चे स्थगित

 

या घटनेच्या निषेधार्थ आम्हाला 10 ते 12 विविध संघटनांनी भेटून येत्या मंगळवारी शांती मोर्चा काढण्याबाबत निवेदन दिले होते. त्याबाबत जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासनाने तात्काळ गांभीर्याने विचार करुन सर्व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची सुसंवाद साधला. दोषींविरुद्ध कोणतीही कायदात कसूर केली जाणार नाही व त्यात दोषी असणाऱ्या व्यक्तींकडून झालेले नुकसान वसूल करण्याबाबतही प्रशासन पूर्ण प्रयत्न करेल, अशा विश्वास विविध संघटनांना दिल्यानंतर त्यांनी मोर्चा संस्थगीत केला आहे. शांतता व सुव्यवस्थेसाठी सर्व मिळून एकदिलाने एकात्मता व शांतता टिकविण्यासाठी दक्ष राहू, असे सर्वांनुमते निश्चित करण्यात आले. (What did Dr. Vipin Itankar say about violence?)

 

नागरिकांनी शांतता राखावी

नांदेड जिल्हावासियांनी कोरोनाच्या काळात खूप संयम दाखवून आपशी भाईचारा निभावला आहे. तोच भाईचारा नांदेडकर यापुढील काळातही निभावून गोरगरिबांच्या रोजीरोटीसाठी शांतता प्रस्थापित करण्यासाठी पुढाकार घेतील अशा विश्वास जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी व्यक्त केला. जिल्हा पोलीस दल व जिल्हा प्रशासनाच्यावतीने त्यांनी नागरिकांनी शांतता राखण्याचे आवाहन केले. (What did Dr. Vipin Itankar say about violence?)

Local ad 1