उष्माघातापासून वाचण्यासाठी काय घ्याल काळजी ; सांगतायेत जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ. नागनाथ यमपल्ले

यंदाचा उन्हाळा नेहमीपेक्षा तीव्र असून याकाळात काय काळजी घ्यावी, असा नेहमी प्रश्न पडतात. यंदा पुण्यात उन्हाचा पारा अगदी चाळिशीपार गेला आहे. मराठवाडा आणि विदर्भातील उन्हाचा फिल पुण्यात अनुभवायला मिळत आहे. राज्यात उष्माघाताच्या घटना समोर येत आहेत. सध्याचे उन पुणेकरांसाठी किती हानीकारक आहे? उष्माघाताचा धोका आपल्याला आहे का? उन्हाळा सुसह्य हाेण्यासाठी काय करायला हवे? (Take care in case of heat stroke) यासह अन्य प्रश्नांचे उत्तर औंध जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ.नागनाथ यमपल्ले (Dr. Nagnath Yampalle, District Surgeon of Aundh District Hospital) यांनी दिले आहेत. (What care should be taken to prevent heat stroke?)

 

 

प्रश्न : उष्माघात म्हणजे काय? What is heatstroke?
डाॅ. यमपल्ले : बाहेरील तापमान कितीही असले, तरी घाम येऊन शरीराचे तापमान ३७ अंश सेल्सिअस ठेवण्याचा प्रयत्न शरीर करत असते. प्रखर उन्हात ऊन टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक काळजी न घेता काम केल्यास शरीराचे तापमान वाढते. यावेळी शरीरातील पाण्याचे प्रमाणही संपलेले असल्यास घाम निर्माण करणारी यंत्रणा बंद पडते. शरीराचे तापमान नियंत्रित करणारी हायपोथॅलॅमसमधील यंत्रणा कोलमडते आणि अतिउष्णतेने शरीरातल्या प्रथिनांवर दुष्परिणाम होऊन पेशींमधील जीवनप्रक्रिया थांबते. या प्रक्रियेला उष्माघात असे म्हणतात. यालाच हीटस्ट्राेक किंवा सनस्ट्राेक असेही म्हणतात.

 

 

प्रश्न : उष्माघाताची लक्षणे काय आहेत? (what is heatstroke symptoms)
डाॅ. यमपल्ले : रुग्णाची त्वचा काेरडी पडणे, जीभ काेरडी पडणे ही उष्माघाताची मुख्य लक्षणे आहेत. साेबतच धाप लागते, गाेंधळलेली मन:स्थिती, बेशुद्धपणा ही लक्षणे आहेत. तसेच शरीराचे तापमान १०० अंशांपेक्षा जास्त वाढते. लघवीच्या वेळी जळजळ होत असते. (what is heatstroke symptoms)

 

 

प्रश्न : पुण्यात उष्माघाताचे किती रुग्ण आढळले?
डाॅ. यमपल्ले : आतापर्यंत पुण्यात उष्माघाताचा एकही रुग्ण आढळलेला नाही. उष्माघाताचे महाराष्ट्रात मालेगाव, जळगाव येथे रुग्ण आढळले, तसेच मृत्यूही झालेले आहेत. पण, पुण्यात मात्र जिल्हा रुग्णालय असाे किंवा ग्रामीण रुग्णालय वा उपजिल्हा रुग्णालय येथे उष्माघाताच्या एकाही रुग्णाची नाेंद झालेली नाही. (What care should be taken to prevent heat stroke?)

 

 

 उष्माघाताचा धोका किती वाटताे?
डाॅ. यमपल्ले : पुण्यात तरी उष्माघाताचा धोका नाही. जर तसे काही असेल तर आम्हाला हवामान खाते तशी सूचना आधीच देते. त्यानुसार आम्ही आमच्या आरोग्य यंत्रणेला सतर्क करताे. परंतु, १५ जूनपर्यंत आपल्याला काळजी घेणे गरजेचे आहे. ४० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमान गेल्यास काळजीचे कारण असते. याबाबत सूचना आरोग्य खात्याने आम्हाला दिल्या आहेत. तसेच उष्माघात बाबत जनजागृती करायला सांगितले आहे. काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक घेतली होती. त्या बैठकीत दिलेल्या सूचनांप्रमाणे आम्ही सर्व तयारी केली आहे.

 

 

प्रश्न : रुग्ण आढळल्यास त्याच्यावर उपचार करण्यासाठी आपल्याकडे काय यंत्रणा आहे?

डाॅ. यमपल्ले : उष्माघाताच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी जिल्हा रुग्णालयात ५ बेड असलेला एक कक्ष राखीव ठेवण्यात आला आहे. तसेच ओआरएस पावडर, सलाइन, औषधे उपलब्ध आहेत. तसेच प्रत्येक ग्रामीण रुग्णालयांत दाेन बेड राखीव ठेवण्यात आले आहेत. सोबत उपचारासाठी यंत्रणाही सज्ज आहे. तसेच येथे येणाऱ्या रुग्णांसाठी आम्ही ठिकठिकाणी पाण्याचे दहा कूलर बसवलेले आहेत. (What care should be taken to prevent heat stroke?)

 

 

प्रश्न : उष्माघाताच्या रुग्णांवर उपचार कसे करताे ?
डाॅ. यमपल्ले : त्या रुग्णाला स्पंजिंग केले जाते. सलाइन लावून त्याच्या शरीरातील पाण्याची पातळी वाढवली जाते. गरज पडल्यास बर्फाच्या पाण्याने आंघोळ घातली जाते. गरजेनुसार इतर उपचार केले जातात. (what would be the correct treatment for a person suffering from heat exhaustion or heat stroke)
प्रश्न : उष्माघात टाळण्यासाठी काय काळजी घ्यायला हवी? (What care should be taken to prevent heat stroke?)
डाॅ. यमपल्ले : दुपारी १२ ते ३ च्या दरम्यान गरज नसताना बाहेर पडू नये. बाहेर पडायचे असल्यास पाण्याची बाटली साेबत असू द्यावी. पाणी, सरबत, लस्सी सातत्याने पित राहावे; परंतु, काेल्ड्रिंक व चहा पिऊ नये. उन्हात काम करायचे असल्यास डाेक्याला पांढरा कपडा बांधावा. उष्माघातासारखा त्रास झाला तर जवळच्या सरकारी रुग्णालयात रुग्णाला घेऊन जावे तसेच प्राथमिक उपचार म्हणून थंड पाण्याने अंग पुसून घ्यावे. (What care should be taken to prevent heat stroke?)
Local ad 1