(Weather Alert) खूखबर… मान्सूनचे गुरुवारी केरळमध्ये आगमन 

मुंबई : भारतीय हवामान विभागाने मान्सून केरळमध्ये पुढील 24 तसांत म्हणजेच 3 जूनला पोहचणार असल्याची माहिती दिली. यापुर्वी एक जूनला मान्सून येईल, असा अंदाज वर्तविण्यात आला होता. (Weather Alert)  परंतु वाऱ्याचा प्रवाह सक्रीय नसल्याने केरळमधील मान्सूनचे आगमन लांबले होते. 

हवामान विभागानं यापूर्वी मान्सून 1 जूनला पोहोचणार असल्याचे सांगितले होते. यास आणि तोक्ते चक्रीवादळाच्या परिणामामुळे 31 मे रोजी मान्सून केरळात दाखल होईल, अला अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मान्सून केरळात दाखल झाला की, नाही हे घोषित करण्यासाठी काही निकष भारतीय हवामान विभागाने निश्चित केले आहेत. (Weather Alert)


हवामान विभागाने निश्चित केलेल्या 14 केंद्रांपैकी 60 टक्के केंद्रांवर 10 मे नंतर 2 दिवसांमध्ये 2.5 mm पावसाची नोंद होणे आवश्यक आहे. यामध्ये मिनीकॉय, अमिनी, थिरुअनंतरपुरम, पुनालूर, कोल्लम, अल्लापुझा, कोट्टायम, कोची, थ्रिसुर, कोझिकोडे, थलासरी, कन्नूर, कुडूलू आणि मंगलोर केंद्राचा समावेश आहे. यापैकी 60 टक्के म्हणजेच जवळापास 9 ठिकाणी दोन दिवसांमध्ये 2.5 mm पावसाची नोंद होणे आवश्यक आहे. वारे फील्ड या निकषामध्ये वेस्टरलीज़ची उंची (Westerly winds) 600 hpa पर्यंत असणे आवश्यक असून, त्याची गती 15-20kts असली पाहिजे. (Weather Alert)

Local ad 1