...

आम्ही प्लॅस्टिक पिशवी, वस्तू वापरणार नाही ; विद्यार्थी, पालक, शिक्षकांनी घेतली सामूहिक शपथ

पुणे,”आम्ही रोजच्या वापरात प्लॅस्टिक पिशवी, डबा अशा वस्तू वापरणार नाही,’ अशी शपथ धायरी येथील स्वानंद प्राथमिक विद्यालयाच्या विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांनी घेतली. (We will not use plastic bags or items.)

 

वाळू तस्करांविरोधात आता एमपीडीए कायद्यानुसार कारवाई होणार ; नांदेडमध्ये महसूल विभागाची धडक कारवाई 

पर्यावरण जागृती आणि संवर्धन, ई-कचरा (E-waste) या विषयांवर शाळेत “पूर्णम इकोव्हिजन फाउंडेशन’तर्फे मार्गदर्शन करण्यात आले. या वेळी फाउंडेशनचे दत्तात्रय काळे, विलास पोकळे, ॠषिराज गोसावी, भरत दामले, माधुरी ठकार, शुभदा कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना रंजक पद्धतीने पर्यावरण रक्षणाचे धडे देत प्लॅस्टिकचे दुष्परिणाम समजावून सांगितले. यावेळी स्वानंद विद्यालयाचे अध्यक्ष प्रशांत मनोरे, मुख्याध्यापिका डॉ. श्रुती मनोरे, शिक्षक प्रतिनिधी वंदना कदम यांच्या उपस्थितीत ई-कचरा संकलन केंद्रांची आवश्यकता व कार्य याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. शिवाय, या उपक्रमांत विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवावा असे सूचवण्यात आले. माधुरी ठकार यांनी नैसर्गिक स्रोतांचा वापर काळजीपूर्वक करावा असे मार्गदर्शन केले.

 

यावेळी शुभदा कुलकर्णी यांनी बायो-एंझाइम कसे तयार करावे हे सांगत ताक, पाणी, फुलांच्या पाकळ्या, गुळ वापरून स्वच्छतेचे लिक्विड तयार करू शकतो, याचे प्रात्यक्षिक केले. तसेच ई-वेस्ट, प्लॅस्टिकचे संकलन आणि रि-सायकल कसे करावे याचेही मार्गदर्शन केले. या वेळी शाळेत मकरसंक्रांतीनिमित्त तीळगुळ वाटप आणि हळदी-कुंकू कार्यक्रम ही घेण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार सहशिक्षिका शीतल धावडे यांनी केले.
Local ad 1