(A handful of grain, a handful of water and shelter for the birds) पक्ष्यांसाठी मुठभर धान्य,ओंजळभर पाणी अन् निवारा

  • कलाशिक्षक सलीम आतार यांचा उपक्रम

आठवूनी चिऊ-काऊचा घास

घेऊ चिमण्यांच्या संर्वधानाचा ध्यास..!

जिल्हा परिषद प्रशाला बहिरगाव तालुका कन्नड शाळेतील उपक्रमशील कलाशिक्षक सलिम आतार यांनी जागतीक चिमणी दिनाचे औचित्य साधुन पक्षांसाठी मूठभर धान्य ओंजळभर पाणी व निवारा असा उपक्रम हाती घेतला आहे. आत्तार यांनी शाळेतील विद्यार्थ्यांच्या मदतीने रिकामी पाण्याची बॉटल, नारळ करवंटी ,तेलाचे कॕन, रिकामे खोके आदी  टाकाऊ वस्तु पासून तयार केलेल्या साहित्यात धान्य पाणी व निवार्‍याची पक्षांची  व्यवस्था केली. (A handful of grain, a handful of water and shelter for the birds)


 चिऊ ये, दाना खा ,पाणी पी भुर्रर उडून जा…. असे बडबड गीत बालपणी सर्वांनी ऐकले असेल. या गीताप्रमाणे शहरीकरण व अन्य कारणांनी चिऊ.. चिऊ करणारी चिऊताई दृष्टीआड झाली आहे. (A handful of grain, a handful of water and shelter for the birds)

   बहिरगाव हे गाव आदर्श गाव असून, या शाळेच्या आवारात असंख्य झाडे आहेत. या झाडावर पक्ष्यांची किलबिलाट असतो. परंतु आता उन्हाळा सुरू झाल्याने उन्हाची दाहकता वाढली आहे. चिमण्याच्या धान्य-पाण्याची व्यवस्था करून पक्ष्यां प्रती  बांधिलकी जपली. निसर्गप्रेमी उपक्रम राबवला आहे त्यामुळे परिसरात कौतुक होत आहे. (A handful of grain, a handful of water and shelter for the birds)


 

A handful of grain, a handful of water and shelter for the birds.

उन्हाळा सुरू झाल्यानंतर अन्न पाण्याच्या शोधासाठी चिमण्यांची होणारी परवड कमी व्हावी म्हणून विद्यार्थी व शिक्षक मिळून हा स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे. या व्यवस्थेमुळे चिमण्यांची चिवचिवाट पुन्हा ऐकायला मिळत आहे. कधी न दिसणारे पक्षी सुद्धा शाळेच्या पाणवठ्यावर नियमित येताना दिसत आहेत. विद्यार्थ्यांचा सहभाग असल्याने त्यांची सर्जनशीलता वाढीस लागून प्राणी, पक्षी, वनस्पती आदीबाबद अशा उपक्रमांतून त्यांच्यात जागरूकता निर्माण होण्यास मदत होते, असे मत मुख्याध्यापक दिलीप महाजन यांनी व्यक्त केले. (A handful of grain, a handful of water and shelter for the birds)

 हा उपक्रम यशस्वीतेसाठी प्रशालेचे मुख्याध्यापक दिलीप महाजन, कुलभूषण व्यवहारे, राजेंद्र शिंपी, भाऊसाहेब घोलप, श्याम खोसरे, भास्कर भांबरे, साहेबराव मोरे, हरिभाऊ भोसले, नुतन पवार, सुरेखा पाटील, सलिमखान पठाण यांनी सहकार्य केले आहे. (A handful of grain, a handful of water and shelter for the birds)

Local ad 1