...

मन्याड नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा (Manyad river)

नांदेड ः गेल्या चार दिवसांपासून धरणक्षेत्रात होत असलेल्या सतंतधार पावसामुळे कंधार तालुक्याील बारुळ येथील निम्नमानार प्रकल्पात पाण्याची आवक मोठ्याप्रमाणत आहे. त्यामुळे 100 टक्के प्रकल्प पुर्ण भरले आहे. तर प्रकल्पात येणार्‍या पाण्याचा येवा अधिक असल्याने मन्याड नदी पात्रत पाण्याचा विसर्ग केला जाईल. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्क रहावे, असा इशारा देण्यात आला आहे. (Warning to the villages along the Manyad river)

 

निम्न मानार प्रकल्पाची क्षमता 138 दलघमी असून, धरण क्षेत्रात संसतधार पाऊस होत असल्याने धरणाता येणार्‍या पाण्याचे अधिक आहे. तर पुढील काळात अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे कोणत्याही क्षणी धरणाचे गेट उघडले जाणार आहेत. त्यामुळे नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. बारुळ, रहाटी, तेलूर, कौठा, येलूर, मसलगा, टेभूर्णी, कारला, रातोळी आदी गावांना इशारा देण्यात आला आहे. (Warning to the villages along the Manyad river)

 

प्रकल्पामुळे 23310 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली असून या प्रकल्पाचा कंधार, नायगाव, धर्माबाद, बिलोली या तालुक्यांना पिण्याच्या पाण्यासाठी व सिंचनासाठी उपयोग होतो़ उपयुक्त साठा 138 दलघमी 146़92 दलघमी जलसाठा असलेल्या प्रकल्पाचे पाणलोट क्षेत्र 692 चौरस मैल, 1 हजार 856 चौ़क़िमी़ आहे़ एकूण या प्रकल्पासाठी बुडीत क्षेत्र 2 हजार 860 हेक्टर असून यात 6 गावांची जमीन व गावे पुनर्वसित झाली आहेत़ या प्रकल्पाची मृतसाठा क्षमता 8़710 दलघमी तर उपयुक्त जलसाठा 138़21 दलघमी आहे. (Warning to the villages along the Manyad river)

 

 

तलाठी सज्जा कौठा यांच्या आदेशानुसार दि 23/07/21रोजी मानार धरण बारूळ 100% पूर्ण क्षमतेने भरेलेले आहे. तरी नदीकाठच्या शेतकऱ्यांनी नदीपलीकडे जाऊ नये, गुरे ढोरे सोडू नये, नदी काठावर जाण्यास मनाई करण्यात येत आहे. मन्याड नदी परिसर प्रतिबंधीत क्षत्र घोषित करण्यात येत आहे.
    – तलाठी सज्जा कौठा

 

Local ad 1