दहा नगरपरिषदेच्या निवडणूकीसाठी प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर
नांदेड : राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार नांदेड जिल्ह्यात मे 2020 ते फेब्रुवारी 2022 मध्ये मुदत संपलेल्या कंधार, मुखेड, देगलूर, बिलोली, कुंडलवाडी, धर्माबाद, उमरी, भोकर, मुदखेड व हदगाव या नगरपरिषदांच्या (Municipal Councils of Kandhar, Mukhed, Deglur, Biloli, Kundalwadi, Dharmabad, Umri, Bhokar, Mudkhed and Hadgaon.) सदस्य पदाच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी प्रभाग रचना कार्यक्रम-2022 जाहिर करण्यात आला आहे. (Ward formation program announced for ten municipal elections)
Related Posts
या नगरपरिषदांच्या प्रारुप प्रभाग रचनेवर ज्या कोणत्याही व्यक्तींचे आक्षेप, हरकती, सूचना असतील तर त्यांनी कारणासह, संबंधित नगरपरिषदांच्या मुख्याधिकारी यांच्याकडे त्यांच्या कार्यालयात गुरुवार 10 मार्च ते मंगळवार 17 मार्च 2022 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत लेखी सादर करावे. मुदतीनंतर आलेले आक्षेप, हरकती, सूचना विचारात घेतल्या जाणार नाहीत, याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. (Ward formation program announced for ten municipal elections)