...

Deglaur Assembly by-election । कोरोना नियमावलीचे पालन करुन मतदानाचा हक्क बजवावा : मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे

Deglaur Assembly by-election । नांदेड  : लोकशाही प्रक्रियेत महानगरापासून गावकुसातल्या प्रत्येक मतदाराचे मत हे अत्यंत मोलाचे आहे. मतदानापासून कोणताही मतदार वंचित राहू नये याची खबरदारी निवडणूक विभागाने घ्यावी. मतदारांनीही आपला हक्क बजावण्यासाठी पुढे सरसावून लोकशाही प्रक्रियेला भक्कम करावे, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे (Chief Electoral Officer Shrikant Deshpande) यांनी केले.  (The right to vote should be exercised to strengthen democracy)

 

 

 

देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीची पूर्वतयारी याबाबत त्यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी देगलूर येथे आढावा बैठक झाली. त्यावेळी देशपांडे बोलते होते. बैठकीला जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे, सहमुख्य निवडणूक अधिकारी अनिल वळवी, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) प्रशांत शेळके, उपविभागीय अधिकारी शक्ती कदम आदी उपस्थित होते. (The right to vote should be exercised to strengthen democracy)

 

Nanded latest news । अवैध दारू विक्रेत्याकडून लाच घेणारा पोलीस जमादार अकडकला सापळ्यात

 

निवडणुकीसाठी उभे राहणाऱ्या उमेदवारांनी जर त्यांच्यावर गुन्हेगारी स्वरूपाचे प्रकरणे प्रलंबित असतील तर त्यांनी ज्या पक्षाकडून ते निवडणूक लढवित आहेत त्या पक्षाला वस्तुस्थिती कळविली पाहिजे. पक्षानेही अशी जर माहिती असेल तर ती आपल्या पक्षाच्या संकेतस्थळावर दर्शवून जनतेपर्यंत पोहोचवली पाहिजे, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने लोक प्रहरी विरुद्ध भारत सरकार व इतर आणि पब्लीक इंट्रेस्ट फाउंडेशन आणि इतर विरुद्ध भारत सरकार व इतर या प्रकरणाच्या निकालात स्पष्ट केल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी दिली.

 

Yellow alert news । पाऊस नांदेडकरांची पाठ सोडेना ; पुन्हा यलो आलर्ट जारी

 

कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर आपण निवडणूक प्रक्रियेला सामोरे जातांना प्रत्येकाच्या जीवाची काळजी घेण्याला प्राधान्य दिले आहे. या निवडणूकीत मतदान करणारे मतदार, उमेदवार आणि निवडणूक यंत्रणेत सहभागी होणाऱ्या सर्व शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांसह बुथ एजंट पर्यंत लसीकरणाला अनन्य साधारण महत्व दिले आहे. शासकीय यंत्रणेतील सर्वांचे लसीकरण याबाबत खात्री करुनच निवडणूक प्रक्रियेत सर्व स्टाफ नेमला जात आहे. (The right to vote should be exercised to strengthen democracy)

 

 

 

80 वर्षांवरील मतदार, दिव्यांग मतदार, तृतीयपंथी मतदारांना काही आजार असले तर त्यांना मतदान करणे अधिक सोयीचे व्हावे यादृष्टिने स्वतंत्र ॲप तयार केला असून निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर याबाबत सविस्तर माहिती दिलेली आहे. दिव्यांग व्यक्तींनी पूर्वकल्पना दिली तर व्हीलचेअर पासून इतर व्यवस्था मतदान केंद्रातर्फे केली जाईल, असे देशपांडे यांनी स्पष्ट करुन मतदारांना आपल्या मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन केले. (The right to vote should be exercised to strengthen democracy)

 

Web title : The right to vote should be exercised to strengthen democracy 

Local ad 1