(voided lockdown in Pune; Restrictions are strict)पुण्यात लॉकडाऊन टळले ; निर्बंध कडक
पुणे : पुणे शहर व जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून, प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार (deputy chief minister of maharashtra ajit pawar) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठीत निर्बंध कडक करण्याचा निर्णय घेण्यात आला अशी माहिती विभागीय आय़ुक्त सौरभ राव यांनी पत्रकार परिषदेत दिली. (voided lockdown in Pune; Restrictions are strict)
पुणे व पिंपरी चिंचवड शहर आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत असला तरीही शहरात लॉकडाऊन न करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला आहे. पुण्यात 31 मार्चपर्यंत कडक निर्बंध असणार आहेत. संसर्ग प्रतिबंधासाठी उपाययोजनांची कडक अंमलबजावणी केली जाणार आहे. 31 मार्च शाळा काँलेज बंद असणार आहेत. त्याबरोबरच रात्री अकरा ते सहा संचारबंदी, रात्री दहा वाजेपर्यंत हॉटेल सुरु ठेवली जाणार असून, हॉटेल 50 टक्के क्षमतेनेच सुरु ठेवावे लागणार आहे. तसेच लग्न धार्मिक कार्यक्रमांना 50 लोकांनाच परवानगी आहे. मॉल्स आणि सिनेमागह रात्री दहा पर्यंत सुरू सहरातील, असे स्पष्ट करण्यात आले. (voided lockdown in Pune; Restrictions are strict)
या बैठकीला पुणे व पिंपरी चिंचवडचे महापौर, जिल्हा परिषद अध्यक्षा, दोन्ही पालिकांचे आयुक्त, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, दोन्ही शहरांचे पोलिस आयुक्त, जिल्हा पोलिस अधिक्षक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱी उपस्थित होते. (voided lockdown in Pune; Restrictions are strict)