...

PSI Success Story । जर्मनीला जाण्याची ऑफर नाकारून विशालने PSI होऊन वडिलांची इच्छा केली पूर्ण !

PSI Success Story । कंधार : बी.इ. मेकॅनिक इंजिनिअरींचा (B.E. Mechanical Engineering) अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यानंतर एम एस इंजिनियर मास्टर ऑफ सायन्ससाठी (MS Engineer Master of Science) जीआरई ही परीक्षा (GRE Exam) दिली. त्यातून तो जर्मनी येथे पुढील शिक्षणासाठी पात्र ही ठरला. मात्र, आपला मुलगा पोलिस अधिकारी व्हावा, अशी वडिलांची इच्छा होती. ती इच्छा इच्छा पुर्ण करण्यासाठी मुलाने जर्मनीला जाण्याची ऑफर (Offer to go to Germany) नाकारून एमसपीएससीची तयारी करत थेट पोलिस उपनिरिक्षक होऊन वडिलांची इच्छा पूर्ण केली आहे. (Vishal fulfilled his father’s wish by becoming a PSI!)

 

 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत कंधार तालुक्यातील गोगदरी येथील विशाल व्यंकटराव कल्याणकर (Vishal Venkatrao Kalyankar) यांची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाली. याबद्दल गावांत जेसीबीत मिरवणूक (Procession at JCB)काढत पेढे वाटून आनंद साजरा करण्यात आला.

 

PSI Success Story । सालगड्याचा पोरगा पीएसआय झाला अन् गावकऱ्यांनी काढली गावात मिरवणूक

 

विशालचे प्राथमिक शिक्षण व उच्च शिक्षण (Primary Education and Higher Education) नांदेड येथे झाले. वडील शिक्षक असल्यामुळे घरामध्ये शैक्षणिक वातावरण होते. सिंहगड येथे बी. इ.मेकॅनिक इंजिनिअर 2017 मध्ये  हा अभ्यासक्रम पूर्ण केला. एम.एस. इंजिनियर मास्टर ऑफ सायन्ससाठी जीआरई ही परीक्षा ही दिली. त्यातून तो जर्मनी येथे जाण्यसाठी पात्रही झाला. परंतु वडीलांना लहानपणापासूनच आपला मुलगा पोलीस अधिकारी होऊन देश सेवा करावी, अशी इच्छा होती. विशालचे वडील हे गोगदरीचे सरपंच ही होते.

 

psi success story Vishal fulfilled his father's wish by becoming a PSI

 

विशाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची  2019 मध्ये प्रथमच परीक्षा दिली. मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) माध्यमातून तो पात्र ठरला. परंतु आरक्षण रद्द झाल्यामुळे पुन्हा त्याने 2020 मध्ये एमपीएससीची दुसऱ्यांचा परीक्षा दिली. त्यामध्ये खुल्या प्रवर्गातून त्यांने यश संपादन करत राज्यातून 33 व्या क्रमांकावर उत्तीर्ण झाला आहे. गावकऱ्यांनी आपल्या गावातील पहिला मुलगा पोलीस अधिकारी झाल्याने त्याची जेसीपीमधून मिरवणूक काढली. यावेळी पेढे वाटून आनंद साजरा करण्यात आला

आई-वडिलांच्या प्रेमामुळे सर्व काही…

आई-वडिल, काका आणि माझ्या कुटुंबियांनी मला वेळोवेळी मार्गदर्शन केले. वडिलांची इच्छा होती मी पोलिस अधिकारी व्हावा. त्यांची आणि कुटुंबियांची इच्छा पूर्ण करण्यासाठी मी मन लावून अभ्यास केला. त्यातूनच हे यश प्राप्त झाले आहे. आज गावकऱ्यांनी माझा केलेला सन्मानही माझ्यासाठी मोठा आहे.

– विशाल कल्याणकर, (पोलिस उपनिरिक्षक निवड)

Local ad 1