शिवसेना उमेदवार विजय शिवतारेंनी आचार संहितेचा भंग केल्याची तक्रार

पुणे : पुरंदर विधानसभा शिवसेना महायुतीचे उमेदवार, माजी मंत्री विजय शिवतारे (Former Minister Vijay Shivtare) यांनी निवडणूक प्रचारासाठी ‘एअर बलून’ लावून आचार संहितेचा भंग केल्याचे प्रकरण समोर आले आहे. शिवतारे त्यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करून कारवाई करावी अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस रोहन सुरवसे-पाटील (Maharashtra Pradesh Youth Congress General Secretary Rohan Suravse-Patil) यांनी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.सुहास दिवसे  (District Election Officer Dr. Suhas Diwase) तसेच निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम (Resident Deputy Collector Jyoti Kadam) यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. याप्रसंगी युवक काँग्रेसचे पदाधिकारी अक्षय सागर, सागर घाडगे, ज्ञानेश्वर जाधव हे उपस्थित होते. (Complaint that Shiv Sena candidate Vijay Shivtare violated the code of conduct)